विधानसभेच्या प्रचारावर पावसाचे सावट! मान्सूनच्या परतीचा प्रवास लांबणीवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 06:23 IST2019-10-02T06:23:05+5:302019-10-02T06:23:29+5:30
आॅक्टोबर उजाडला तरी अधूनमधून बरसणाऱ्या पावसाच्या सरींमुळे मुंबईकरांची त्रेधा उडत असतानाच, मान्सूनच्या परतीचा मुहूर्त आणखी आठवडाभर लांबण्याची शक्यता आहे.

विधानसभेच्या प्रचारावर पावसाचे सावट! मान्सूनच्या परतीचा प्रवास लांबणीवर
मुंबई : आॅक्टोबर उजाडला तरी अधूनमधून बरसणाऱ्या पावसाच्या सरींमुळे मुंबईकरांची त्रेधा उडत असतानाच, मान्सूनच्या परतीचा
मुहूर्त आणखी आठवडाभर लांबण्याची शक्यता आहे. हवामान शास्त्र विभागाच्या अंदाजानुसार, १० आॅक्टोबरनंतरच मान्सून राज्यातून माघारी जाईल. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावरही पावसाचे सावट असणार आहे.
साधारणपणे १ सप्टेंबरपर्यंत मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होतो. यापूर्वी १९६१ मध्ये १ आॅक्टोबर रोजी; तर २००७ मध्ये ३० सप्टेंबर रोजी मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला होता. यंदा राज्यात ११० टक्के पावसाची नोंद झाली आहे.
स्कायमेटच्या अंदाजानुसार, कमी दाबाचा पट्टा दक्षिण राजस्थान आणि त्याच्या आसपासच्या क्षेत्रावर आहे. या हवामान प्रणालीभोवती आर्द्रतेचे प्रमाण कमी आहे, म्हणूनच पुढच्या काही दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी राहील. येत्या ५ ते ८ आॅक्टोबरदरम्यान मध्य महाराष्ट्रासह कोकण आणि गोव्यातील काही भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.