क्रिस्टल टॉवरमधील रहिवासी घरी परतले पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 05:37 AM2018-08-24T05:37:25+5:302018-08-24T05:37:43+5:30

उरल्या भग्न आठवणी; जळालेल्या वस्तू विखुरलेल्या अवस्थेत

Residents of Crystal Tower returned home, but ... | क्रिस्टल टॉवरमधील रहिवासी घरी परतले पण...

क्रिस्टल टॉवरमधील रहिवासी घरी परतले पण...

Next

मुंबई : बुधवारी परळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील क्रिस्टल टॉवरच्या बाराव्या मजल्यावर आग लागण्याची दुर्घटना घडली. गुरुवारी क्रिस्टल टॉवरमध्ये जळून खाक झालेल्या वस्तू दिसून येत होत्या. जळलेल्या साहित्याचा लगदा विखुरलेल्या अवस्थेत पडलेला होता. हा लगदा पालिकेच्या संबंधित विभागाने उचलणे अपेक्षित असूनही नाइलाजाने रहिवाशांनी लगदा उचलला, अशी माहिती रहिवाशांनी दिली.
टॉवरमधील रहिवासी भीतीच्या छायेखाली आहेत. बुधवारी रात्री तुलसी मानस मंदिर ट्रस्ट शाळेत दुर्घटनाग्रस्त रहिवाशांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. गुरुवारी सकाळी या शाळेतून रहिवासी क्रिस्टल टॉवरमध्ये राहण्यास गेले, असे स्थानिकांनी सांगितले. गुरुवारी येथील रहिवासी आपआपल्या घरी परतले आहेत. जोपर्यंत न्यायालयातून घरे सील करण्याचा आदेश येत नाही, तोपर्यंत घरे सील करण्यात येत नसल्याने रहिवासी आपल्या घरी परतले आहेत, अशी माहिती गुणरत्न सदावर्ते यांनी दिली. सर्व बाजूने निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे आणि मृत व्यक्ती व त्यांच्या कुटुंबांना न्याय मिळाला पाहिजे. डीसी रेग्युलेशनखाली गुन्हेगारी अ‍ॅक्टनुसार त्याच्या आधारे संबंधितावर कारवाई करण्यात यावी, असे सदावर्ते यांचे म्हणणे आहे.

पाणी, वीजपुरवठा केवळ दुर्घटनेमुळे बंद
पाणी आणि वीजपुरवठा कोणत्याही विभागाने तोडलेला नाही, असे सदावर्ते यांनी सांगितले. शॉर्टसर्किटमुळे वीजपुरवठा बंद केला आहे. वीजपुरवठा बंद झाल्याने पाणीपुरवठा करणारी मशीन बंद झाली आहे. त्यामुळे पाणी बंद आहे.

मुंबई महापालिकेचे साहाय्यक आयुक्त किरण देसाई यांनी सांगितले, पालिकेची पहिली जबाबदारी रहिवाशांची सुटका करणे ही आहे. लगदा उचलण्यासाठी संबंधित विभाग सहकार्य करतो. मात्र त्यासाठी विकासकांकडून पुढाकार घेणे अपेक्षित असते. क्रिस्टल टॉवरला जादा पैसे आकारून पाणीपुरवठा करण्यात येत होता. त्यामुळे पाणी, वीजपुरवठ्याच्या प्रश्नी त्या विभागाकडून माहिती घेण्यात येईल.

Web Title: Residents of Crystal Tower returned home, but ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.