The rent of theaters will be reduced, according to the Chief Minister | नाट्यगृहांचे भाडे कमी करणार, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच

नाट्यगृहांचे भाडे कमी करणार, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच

मुंबई : नाट्यगृहांचे भाडे कमी करण्याच्या मागणीचा सरकार नक्कीच विचार करेल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी दिले. शासनाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार नाट्यप्रयोग करा, कलावंतांची अन् प्रेक्षकांचीही काळजी घ्या, असे आवाहन त्यांनी केले.
मराठी रंगभूमीदिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी नाट्य निर्माते, कलावंतांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला व त्यांच्या सूचनाही ऐकून घेतल्या. प्रत्येक निर्मात्याने कलाकारांचे चेकअप करावे, स्टेजवर कलाकारांनी अंतर ठेवावे. थिएटरमध्ये सुद्धा नो मास्क नो एन्ट्री असे असले पाहिजे. नाट्यगृहाबाहेरील खाण्याचे स्टॉल्सही नियम पाळतात की नाही हे पाहिले पाहिजे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Read in English

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The rent of theaters will be reduced, according to the Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.