Mumbai: चर्चगेट रेल्वे स्थानकाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची मागणी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 16:41 IST2025-06-01T16:39:57+5:302025-06-01T16:41:58+5:30

Churchgate Railway Station Rename News: मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्थानकाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची मागणी केली जात आहे.

Rename Churchgate Station After Ahilyabai Holkar, Says Dhangar Leader On Queen's 300th Birth Anniversary | Mumbai: चर्चगेट रेल्वे स्थानकाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची मागणी!

Mumbai: चर्चगेट रेल्वे स्थानकाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची मागणी!

मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्थानकाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी  धनगर समाजातील मोठे नेते प्रकाश शेंडगे यांनी शनिवारी केली. चर्चगेट रेल्वे स्थानकाजवळ कोणतेही चर्च किवा गेट नाही, मग या रेल्वे स्थानकाचे नाव चर्चगेट का ठेवायचे? चर्चगेट रेल्वे स्थानकाजवळील एका चौकाला आधीच अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्यात आले. आता रेल्वे स्थानकालाही अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता त्यांच्यावरही टीका केली.

सत्तेत आल्यानंतर धनगरांना आरक्षण देऊ, असे आश्वासन देणारा पक्ष अपयशी ठरला आहे. धनगरांना अनुसूचित जातीचा दर्जा देण्याचे आश्वासन देणारा माणूस आता मुख्यमंत्री आहे. ते दुसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत. मात्र, तरीही धनगर समाजाला आरक्षण मिळाले नाही, असे शेंडगे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३००व्या जयंतीनिमित्त अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडीमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर राज्य सरकार चित्रपट काढणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. राज्य सरकार हा चित्रपट बहुभाषिक काढणार, असेही म्हणाले.

Web Title: Rename Churchgate Station After Ahilyabai Holkar, Says Dhangar Leader On Queen's 300th Birth Anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.