Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रदीप शर्माला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा! मनसुख हिरेन हत्याप्रकरणी जामीन मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2023 12:45 IST

प्रदीप शर्मा याला सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

प्रदीप शर्मा याला सर्वाच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. मनसुख हिरेन हत्या प्रकरणी सर्वाच्च न्यायालयाने शर्मा यांना जामीन मंजूर केला आहे. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अँटेलिया येथे ठेवलेले बॉम्ब आणि मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी संशयीत आरोपी म्हणून प्रदीप शर्मा यांना ताब्यात घेतले होते. जामीनासाठी शर्मा यांनी सर्व कोर्टाचे दरवाजे ठोठावले होते. पण सर्व कोर्टांनी गंभीर आरोप आहेत म्हणून जामीन फेटाळला होता, आता सर्वाच्च न्यायालयाने शर्मा यांना जामीन मंजूर केला आहे. 

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना मोठा दिलासा! ‘फोन टॅपिंग’ प्रकरण कायमचं बंद

प्रदीप शर्मा यांनी काही दिवसापूर्वी पत्नीच्या आजारपणाचं कारण देत जामीनासाठी अर्ज केला होता. काही महिन्यांपूर्वी कोर्टाने त्यांना तात्पुरता जामीन मंजूर केला होता कारण त्यांच्या आजारी पत्नीची देखभाल करण्यासाठी कोणीही नाही. यानंतर शर्मा पुन्हा कोर्टात सरेंडर झाले. आता याच कारणासाठी शर्मा यांना कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे आता प्रदीप शर्मा यांना कोर्टाने दिलासा दिल्याचे दिसत आहे. 

नेमकं प्रकरण काय? 

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कुटुंबीयांच्या मनात दहशत बसवण्याच्या कटातील कमकुवत दुआ असलेले ठाण्याचे व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या कटाचा मुख्य सूत्रधार असल्याच्या आरोपाखाली माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना एनआयएने ताब्यात घेतले होते. प्रदीप शर्मा अन्य आरोपींसह पोलीस आयुक्तांच्या कार्यालयाच्या कंपाऊंडमध्ये घेतलेल्या सर्व बैठकांमध्ये हजर होता. यात हिरेन यांच्या हत्येचा कट रचण्यात आला, असे एनआयएने प्रतिज्ञापत्रात म्हटले होते. 

निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याने मनसुख हिरेन यांची हत्या करण्यासाठी प्रदीप शर्मा याला सुपारी म्हणून ४५ लाख दिल्याचा दावाही एनआयएने प्रतिज्ञापत्रात केला आहे.    

टॅग्स :प्रदीप शर्मापोलिसन्यायालय