Join us

नोकरभरती आणि पदोन्नतीची मागणी मान्य, मंत्रिमंडळ बैठकीनंतर नितीन राऊत यांची माहिती

By मोरेश्वर येरम | Updated: January 20, 2021 19:41 IST

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही मंत्र्यांनी नोकरभरतीचा प्रश्न उपस्थित केला

राज्यातील नोकरभरती आणि पदोन्नतीबाबत लवकच मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. कारण आज झालेल्या राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक नेत्यांनी राज्यातील नोकरभरती आणि पदोन्नतीची मागणी केल्याची माहिती समोर आली आहे. 

राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनीही मंत्रिमंडळ बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना याबाबत भाष्य केलं. "नोकर भरतीबाबत मी देखील मागणी केली. गृहखात्याने नोकर भरतीचं परिपत्रक काढलं त्याचप्रमाणे सामान्य प्रशासन विभागाचं परिपत्रक काढावं आणि त्यानुसार नोकर भरती केली जावी, अशी विनंती केली आहे. ती विनंती मान्य झाली आहे", असं नितीन राऊत यांनी सांगितलं आहे. 

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही मंत्र्यांनी नोकरभरतीचा प्रश्न उपस्थित केला, कोरोनामुळे आणि SEBC आरक्षणाला स्थगिती असल्याने रखडलेली नोकरभरती पुन्हा सुरू करण्याबाबत अनेक मंत्र्यांनी केली मागणी. काही तांत्रिक बाबी दूर करून नोकरभरती सुरू करता येईल का याची चाचपणी राज्य सरकारकडून केली जाणार आहे. त्यानंतर रखडलेली नोकरभरती सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो, असं सांगितलं जात आहे. 

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय• कापसाचे चुकारे शेतकऱ्यांना देण्यासाठी कापूस पणन महासंघाला बँकाकडून कर्ज घेण्यास १५०० कोटीची शासन हमी• राज्यात शिक्षण पद्धतीचे अध्यापन, अध्ययन व परिणाम याचे बळकटीकरण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचा निर्णय• खासगी बँकांना शासकीय बँकिंग व्यवहार हाताळण्यास मान्यता 

टॅग्स :उद्धव ठाकरेनितीन राऊतशिवसेनानोकरीकाँग्रेस