निवडणुकीचे काम टाळण्यासाठी कारणांचा भडिमार , मुंबई उपनगरातील चित्र

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2019 06:07 AM2019-10-04T06:07:10+5:302019-10-04T06:07:31+5:30

लोकशाहीचा मोठा उत्सव असलेल्या निवडणुकांसाठी राजकीय पक्ष, कार्यकर्ते, जनता पाच वर्षे प्रतीक्षा करत असते. या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत ज्या सरकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांचा समावेश असतो त्यांच्यासाठी ही मोठी सन्मानाची बाब असते.

reasons to prevent election work | निवडणुकीचे काम टाळण्यासाठी कारणांचा भडिमार , मुंबई उपनगरातील चित्र

निवडणुकीचे काम टाळण्यासाठी कारणांचा भडिमार , मुंबई उपनगरातील चित्र

Next

- खलील गिरकर

मुंबई : लोकशाहीचा मोठा उत्सव असलेल्या निवडणुकांसाठी राजकीय पक्ष, कार्यकर्ते, जनता पाच वर्षे प्रतीक्षा करत असते. या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत ज्या सरकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांचा समावेश असतो त्यांच्यासाठी ही मोठी सन्मानाची बाब असते. मात्र काही कर्मचारी व अधिकाऱ्यांकडून हे काम टाळण्यासाठी आजारपण, हृदयरोग, मुलांचे आजारपण, आई-वडिलांचे आजारपण अशा कारणांसह अनेक विचित्र कारणांचा भडिमार केला जात असल्याचे समोर आले आहे.

निवडणुकीचे काम टाळण्यासाठी काही कर्मचारी व अधिकाºयांकडून पुरेपूर प्रयत्न केला जात आहे. यासाठी एका कर्मचाºयाने वरिष्ठांकडे जाताना हाताला प्लॅस्टर लावले होते, प्लॅस्टरमुळे काम करता येणार नसल्याने निवडणुकीच्या कामातून मुक्त करण्याची विनंती त्याने केली. मात्र वरिष्ठांना हाताला लावलेल्या प्लॅस्टरबाबत संशय आल्याने त्यांनी वैद्यकीय अधिकाºयांकडून चौकशी करण्याचे निर्देश देण्यास सांगताच कर्मचाºयाने हाताला लावलेले प्लॅस्टर काढून टाकले व गुपचुप कामावर हजर होण्यास राजी झाला. तर एका कर्मचारी दाम्पत्याने त्यांचा मुलगा मतिमंद असल्याने निवडणुकीचे काम करता येणार नाही असे आर्जव केले. मात्र नवरा-बायको दोन्ही व्यक्ती सरकारी कार्यालयात नियमितपणे काम करत असताना मुलाची व्यवस्था कशी पाहतात, हे विचारल्यावर त्यासाठी स्वतंत्र व्यक्ती ठेवल्याचे समोर आले. कामावर जाण्यासाठी अडचण होत नसताना केवळ निवडणुकीच्या कामासाठी कशी अडचण होते, असे विचारल्यावर गपगुमान कामावर रुजू होण्याशिवाय त्या दाम्पत्याकडे पर्याय उरला नाही.

काही जणांनी आपल्याला हृदयरोग, रक्तदाब अशा समस्या असल्याचे सांगितले. त्यावर या समस्या असतील तर निवडणुकीचे काम करता येणार नाही, मात्र सरकारी काम करण्यासही तुम्ही वैद्यकीयदृष्ट्या सक्षम नसल्याचा अहवाल पाठवण्याचा इशारा दिल्यावर या कर्मचाºयांचे सर्व आजार, समस्या त्वरित दूर पळत असल्याचा अनुभव सांगण्यात आला. काम टाळणाºया कर्मचाºयांचे प्रमाण २५ ते ३० टक्के आहे. मात्र दुसरी बाजू म्हणजे ७० ते ७५ टक्के कर्मचारी मात्र ही कामे आनंदाने करतात. लोकशाहीच्या उत्सवामध्ये आपलेही योगदान असावे असे त्यांना वाटते.

कामातून तीन हजार कर्मचा-यांना मुक्ती

मुंबई उपनगर जिल्ह्यात निवडणुकीच्या कामातून मुक्त करण्यासाठी सुमारे ६ हजार जणांनी अर्ज केले होते. त्यापैकी कारणांची पडताळणी करून सुमारे अडीच ते तीन हजार जणांना या कामातून मुक्त करण्यात आले आहे. मात्र खोटी कारणे दाखवणाºयांना कारवाईचा इशारा देताच त्यांच्या समस्या त्वरित दूर झाल्याचा अनुभव वरिष्ठांना आला आहे.

Web Title: reasons to prevent election work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.