'रिअल स्क्विड गेम आणि हा गेम दररोज खेळावा लागतो'; मुंबई लोकलचा 'हा' व्हिडीओ तुम्ही बघितला का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 18:27 IST2025-01-22T18:25:08+5:302025-01-22T18:27:16+5:30

Mumbai local Viral Video: मुंबई लोकलमधील गर्दीचे नेहमीच व्हिडीओ व्हायरल होत असतात. एक व्हिडीओ सध्या सगळी शेअर होतोय, जो बघून तुम्हालाही धक्का बसेल. 

'Real Squid Game and this game has to be played every day'; Have you seen 'this' video from Mumbai Local? | 'रिअल स्क्विड गेम आणि हा गेम दररोज खेळावा लागतो'; मुंबई लोकलचा 'हा' व्हिडीओ तुम्ही बघितला का?

'रिअल स्क्विड गेम आणि हा गेम दररोज खेळावा लागतो'; मुंबई लोकलचा 'हा' व्हिडीओ तुम्ही बघितला का?

Viral Video of Mumbai local Train: मुंबई लोकल ट्रेनमधून गर्दीच्या वेळी प्रवास करणं सोप्पं नाहीये. लाखो लोक दररोज धक्के खात ऑफिसपर्यंत पोहोचतात आणि धक्के खात घरी येतात. त्यामुळे मुंबई लोकलचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. आता एका स्थानकावरील व्हिडीओ सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे. हा व्हिडीओ कोणत्या स्टेशनवरील आहे, हे अद्याप निश्चित नसलं, तरी काही जण ठाणे स्थानकावरील ही गर्दी असल्याचे दावे करत आहेत. ही गर्दी बघून 'हा खरा स्क्वीड गेम आहे', अशी प्रतिक्रिया उमटल्या आहेत. (Mumbai Local Viral Video)

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

इतकी गर्दी असेल, तर प्रवास कसा सुखद आणि मंगलमय होईल? असा प्रश्न तुम्हाला हा व्हिडीओ बघून पडेल.

व्हिडीओत स्टेशनवर इतकी गर्दी दिसत आहे की, ट्रेनमधून उतरणं प्रवाशांसाठी कठीण बनलं आहे. त्याचबरोबर लोकल ट्रेनमध्ये चढण्यासाठी इतकी गर्दी झालीये की, चेंगराचेंगरीसारखी दृश्य दिसत आहे. 

मुंबई लोकलचा हा व्हायरल व्हिडीओ बघा


हाच खरा स्क्वीड गेम आणि दररोज खेळावा लागतो; कमेंट्स काय?

मुंबई लोकलच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. हा खरा स्क्वीड गेम आहे आणि हा दररोज खेळावा लागतो, असे एका नेटकऱ्याने म्हटले आहे. 

दुसऱ्या एकाने उपरोधिक भाषेत 'मुंबई मेरी जान... लेले', असे म्हटले आहे. तर एक नेटकऱ्याने 'आणि आपणे हे अशी वागणूक मिळावी म्हणून टॅक्स भरतो', असे कमेंट केली आहे. एकजण म्हणाला, 'हा कोणतंही बक्षीस न मिळणारा स्क्वीड गेम आहे.'

Web Title: 'Real Squid Game and this game has to be played every day'; Have you seen 'this' video from Mumbai Local?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.