"Raut will have to have many births for this" | ''त्यासाठी राऊत यांना अनेक जन्म घ्यावे लागतील''
''त्यासाठी राऊत यांना अनेक जन्म घ्यावे लागतील''

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाअध्यक्ष अमित शहा यांना समजून घेण्यासाठी संजय राऊत यांना अनेक जन्म घ्यावे लागतील असा टोला भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी लगावला आहे. शुक्रवारी राऊत यांचा वाढदिवस होता.त्यानिमित्त शुभेच्छा देताना वयासोबत त्यांच्या विचारांची परिपक्वताही वाढावी असा टोमणाही शेलार यांनी लगावला आहे. शेलार पत्रकारांशी बोलत होते. पंतप्रधान मोदी आणि शिवसेना यांच्यात कोणीतरी मुददाम दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.

अमित शहा यांनी चचेर्ची माहिती मोदी यांना न देता त्यांना अंधारात ठेवल्याचा आरोप राऊत केला होता.त्यावर शेलार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात विसंवाद निर्माण करण्यासाठी रोज एकपात्री वगनाटयाचा प्रयोग सुरू आहे. संजय राउत यांनी अमित शहा, पंतप्रधान मोदी यांना शिवसेनेपासून दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.

मोदी आणि बाळासाहेबांचे एक खास नाते होते. हे नाते मोदी पंतप्रधान होण्याआधीपासूनचे होते. मात्र आता एक अदृश्य शक्ती मोदी आणि उद्धव ठाकरेंमध्ये फूट पाडू इच्छित असल्याचे शेलार म्हणाले. आधी मातोश्रीमधून राज ठाकरेंना भेटण्यासही कोणी जात नव्हते. आता माणिकराव ठाकरेंना भेटायला जायची वेळ आली आहे. सत्तेच्या हव्यासापोटी पंचतारांकित हॉटेलात एकमेकांना भेटायची शर्यत लागल्याचे ते म्हणाले.

Web Title: "Raut will have to have many births for this"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.