रश्मी ठाकरेंनी केले राज ठाकरेंचे स्वागत; ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेला पुन्हा उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 05:27 IST2024-12-17T05:26:34+5:302024-12-17T05:27:07+5:30

निवडणुकीत उद्धव आणि राज यांनी एकमेकांवर टीका केली होती. मनसे आणि उद्धवसेनेला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याच्या मागणीने जोर धरला होता.  

rashmi thackeray welcomes raj thackeray and talks of thackeray brothers coming together reignite | रश्मी ठाकरेंनी केले राज ठाकरेंचे स्वागत; ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेला पुन्हा उधाण

रश्मी ठाकरेंनी केले राज ठाकरेंचे स्वागत; ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेला पुन्हा उधाण

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या मुलाच्या लग्नाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते. उद्धव यांच्या पत्नी श्रीमती रश्मी ठाकरे यांनी राज यांचे स्वागत केले. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले आहे.

श्रीधर पाटणकर यांचा मुलगा शौनक याचा विवाह सोहळा रविवारी मुंबईतील ताज लँड्स एण्ड या हॉटेलमध्ये झाला. पाटणकर कुटुंबीयांच्या निमंत्रणाला मान देत राज ठाकरे लग्नाला आले होते. मात्र, सोहळ्यात दोन्ही ठाकरे बंधूंची प्रत्यक्षात भेट झाली नाही. निवडणुकीत उद्धव आणि राज यांनी एकमेकांवर टीका केली होती. परंतु, मनसे आणि उद्धवसेनेला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याच्या मागणीने जोर धरला होता.  

Web Title: rashmi thackeray welcomes raj thackeray and talks of thackeray brothers coming together reignite

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.