'ब्रेकअप के बाद' रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण पुन्हा एकत्र  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2018 13:54 IST2018-04-20T13:54:01+5:302018-04-20T13:54:01+5:30

दीपिका पादुकोण आणि रणबीर कपूर पुन्हा एकत्र ?

ranbir kapoor and deepika padukone ramp walk together mijwan fashion event | 'ब्रेकअप के बाद' रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण पुन्हा एकत्र  

'ब्रेकअप के बाद' रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण पुन्हा एकत्र  

मुंबई - बॉलिवूडचा रॉकस्टार रणबीर कपूर आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण पुन्हा एकत्र आले आहेत. रणबीर आणि दीपिकानं खासगी आयुष्यात पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला की काय ? असं जर तुम्हाला वाटतं असे तर तुमच्या धावणाऱ्या विचारांना जरा ब्रेक लावा. कारण, तुम्ही विचार करताय तसं काहीही नाहीय. पण या 'तमाशा' जोडीला पुन्हा एकत्र पाहून त्यांचे चाहते मात्र भलतेच खूश झाले आहेत, एवढं मात्र खरंय. 

नुकत्याच झालेल्या मिजवान फॅशन वीकमध्ये मनीष मल्होत्रासाठी दीपिका-रणबीरनं एकत्र रॅम्प वॉक केला. या शोमध्ये दोघंही हातांमध्ये हात गुंफून रॅम्प वॉक करताना दिसले. दीपिका-रणबीर रॅम्प वॉक करताना अतिशय सुंदर दिसत होते. भलेही रणबीर आणि दीपिकाचं ब्रेकअप झाले असेल मात्र आजही दोघांमध्ये चांगलं बॉन्डिंग आहे. या फॅशन शोदरम्यानचे दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यांच्या फोटोंवर चाहत्यांनी लाईकचा प्रचंड वर्षाव केला आहे. या रॅम्प वॉकदरम्यान दीपिकानं सुंदर ग्लिटरी गाऊन परिधान केला होता तर काळ्या रंगाच्या शेरवानीमध्ये रणबीर हटके दिसत होता. खरंतर हा फॅशन शो 9 एप्रिलला होणार होता, मात्र रणबीर व दीपिका आजारी पडल्यानं हा कार्यक्रम 19 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आला होता. 

या फॅशन शोमध्ये शबाना आझमी, जावेद अख्तर, मौनी रॉय, नीतू कपूर, डेजी शाह, पुलकित सम्राट आणि यामी गौतमदेखील सहभागी झाले होते. ब्रेक-अपनंतर रणबीर-दीपिका 'ये जवानी है दीवानी' आणि 'तमाशा' सिनेमांमध्ये एकत्र दिसले होते.

Web Title: ranbir kapoor and deepika padukone ramp walk together mijwan fashion event