येस बॅँकेच्या राणा कपूर यांना अटक; पहाटे 4च्या सुमारास ईडीकडून कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2020 01:36 AM2020-03-08T01:36:15+5:302020-03-08T06:47:15+5:30

कपूर यांच्या वरळीच्या समुद्र महाल टॉवरमधील निवासस्थानी व परळ कार्यालयावर छापेमारी सुरू होती. कपूर यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा नोंदविला आहे.

Rana Kapoor hangs sword on Yes Bank; Inquiries from the ED | येस बॅँकेच्या राणा कपूर यांना अटक; पहाटे 4च्या सुमारास ईडीकडून कारवाई

येस बॅँकेच्या राणा कपूर यांना अटक; पहाटे 4च्या सुमारास ईडीकडून कारवाई

Next

मुंबई : निर्बंध घातलेल्या येस बॅँकेचे संस्थापक राणा कपूर यांची सक्तवसुली संचालनालयातर्फे (ईडी) शनिवारी कसून चौकशी करण्यात आली. सुमारे २० तास चाललेल्या चौकशीत बॅँकेची बेकायदेशीर कर्ज प्रकरणे, बेनामी व्यवहार याविषयी त्यांना प्रश्न विचारण्यात आले. चौकशी केल्यानंतर पहाटे ४ च्या सुमारास  कपूर यांना अटक करण्यात आली आहे. 

कपूर यांच्या वरळीच्या समुद्र महाल टॉवरमधील निवासस्थानी व परळ कार्यालयावर छापेमारी सुरू होती. कपूर यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा नोंदविला आहे. बँकेचे दस्ताऐवज, मोठे कर्जदार व बॅँकेशी व्यवहार करणाऱ्या कंपन्यांसंबंधीचा दस्ताऐवज ईडीने जप्त केल्याचे सांगण्यात आले. येस बॅँकेच्या आर्थिक नुकसानीला राणा कपूर जबाबदार असल्याचे ईडीच्या चौकशीतून समोर आले आहे. मनमानीपणे कर्जवाटप, वसुलीसाठी नियमबाह्य झुकते माप दिल्याचे व्यवहारांतून स्पष्ट झाले आहे. अनिल अंबानी ग्रुप, आयएल अँड एफएस, सीजी पॉवर, एस्सार पॉवर, रेडियस डेव्हलपर्स आणि मंत्री ग्रुप आदी कंपन्यांना शेकडो कोटींची कर्जे नियमबाह्य पद्धतीने दिल्याचा आरोप आहे. तीन वर्षांपूर्वी बॅँकेने ६,३५५ कोटींचे कर्ज ‘बॅड लोन’मध्ये वर्ग केले. त्याच्या वसुलीसाठी प्रयत्न केले नसल्याचा ठपका कपूर यांच्यावर असल्याचे समजते.

स्टेट बँकेचा ताबा
येस बँकेचे २,४५0 कोटी रुपये किमतीचे २४५ कोटी समभाग खरेदीला स्टेट बँक ऑफ इंडियाने संमती दिली आहे. या बँकेच्या समभागांची संख्या केवळ १0 रुपये आहे. त्यामुळे येस बँकेची ४९ टक्के मालकी स्टेट बँकेकडे येईल. त्याला संमती मिळाल्यास सर्व कर्मचाऱ्यांना आहे त्या वेतनावर कामावर ठेवण्यात येईल आणि भाग-भांडवल २६ टक्क्यांपेक्षा कमी होऊ देणार नाही, असे स्टेट बँकेने म्हटले आहे.

Web Title: Rana Kapoor hangs sword on Yes Bank; Inquiries from the ED

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.