झुंजार मच्छिमार नेते रामभाऊ पाटील यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2018 10:17 PM2018-07-29T22:17:21+5:302018-07-29T22:17:32+5:30

ज्येष्ठ मच्छिमार नेते आणि वर्ल्ड फिश फोरम चे माजी सदस्य, नॅशनल फिश वर्कर्स फोरम,महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे माजी अध्यक्ष रामचंद्र कांना पाटील उर्फ रामभाऊ पाटील यांचे आज रात्री वयाच्या 79 व्या वर्षी मुंबईत दुःखद निधन झाले.

Rambhau Patil Passes Awey | झुंजार मच्छिमार नेते रामभाऊ पाटील यांचे निधन

झुंजार मच्छिमार नेते रामभाऊ पाटील यांचे निधन

Next

मुंबई - ज्येष्ठ मच्छिमार नेते आणि वर्ल्ड फिश फोरम चे माजी सदस्य, नॅशनल फिश वर्कर्स फोरम,महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे माजी अध्यक्ष रामचंद्र कांना पाटील उर्फ रामभाऊ पाटील यांचे आज रात्री वयाच्या 79 व्या वर्षी मुंबईत दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, जिवीतेश, प्रशांत ही दोन मुलगे व वंदना ही एक मुलगी दोन नातवंडे असा परिवार आहे.
गेले 4 वर्षे ते मूत्रपिंडाच्या विकाराने आजारी होते.त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना अंधेरी पश्चिम येथील बीएसइएस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.उपचारा दरम्यान आज रात्री त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्यावर उद्या दुपारी अंत्यसंस्कार त्यांच्या जन्मगावी पालघर वडराई, माहीम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे सरचिटणीस किरण कोळी यांनी दिली. त्यांनी राष्ट्र सेवादलातून तरुण वयात समाजसेवक म्हणून झोकून घेतले, वडराई मच्छिमार संस्थेचे अध्यक्ष, सरपंच, महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती, नँशनल फिशवर्क्स फोरम या संघटनेची अध्यक्षपदी होते. तर वर्ल्ड फिश फोरम पिपल संघटनेवर आशियाई खंडाचे प्रतिनिधी म्हणून काम पाहिले होते.

Web Title: Rambhau Patil Passes Awey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.