Rakesh Maria Book : Rakesh will investigate Maria's allegations - Home minister | Rakesh Maria Book : राकेश मारिया यांच्या आरोपांची शहानिशा करणार - गृहमंत्री

Rakesh Maria Book : राकेश मारिया यांच्या आरोपांची शहानिशा करणार - गृहमंत्री

ठळक मुद्देदेवेन भारती यांच्यावर केलेल्या आरोपांबाबतची शाहनिशा करुन योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे गृहमंत्री यांनी सांगितले.दाव्यामुळे या बहुचर्चित हत्याकांड प्रकरणातील आयपीएस लागेबांधेबाबत पोलीस वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.

मुंबई : राकेश मारिया यांनी आपल्या आत्मचरित्रात देवेन भारती यांच्यावर केलेल्या आरोपांबाबतची शहानिशा करुन योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मारिया यांच्या ‘ लेट मी से इट नाऊ ’ (Let me say it Now) या आत्मचरित्रामध्ये तत्कालिन सहआयुक्त व सध्याचे एटीएसचे प्रमुख देवन भारती यांच्यावर टीका करीत शीना बोरा प्रकरणातील माहिती लपवून ठेवली होती, असा आरोप केला आहे. त्यांच्या दाव्यामुळे या बहुचर्चित हत्याकांड प्रकरणातील आयपीएस लागेबांधेबाबत पोलीस वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.

पोलीस महासंचालक कार्यालयातील राष्ट्रपती पोलीस पदक वितरण सोहळ्यानंतर गृहमंत्री देशमुख पत्रकारांशी बोलताना म्हणाले,‘ मारिया यांचे आत्मचरित्र आपण वाचलेले नाही. त्यामुळे त्यांनी देवेन भारती व इतर अधिकाऱ्यांबाबत काय आरोप केले आहेत, याबाबत माहित नाही. त्यांच्या आरोपाची पुर्णपणे शाहनिशा केली जाईल. त्यानंतर त्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल. सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही.

 

 

English summary :
Home Minister Anil Deshmukh told reporters that Rakesh Maria, in his autobiography, will investigate the allegations against Deven Bharti in Sheena Bora Murder Case.

Web Title: Rakesh Maria Book : Rakesh will investigate Maria's allegations - Home minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.