इतकं खोटं बोलणारा पंतप्रधान कधी पाहिलेला नाही, राज ठाकरेंची मोदींवर बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2017 12:25 PM2017-09-30T12:25:36+5:302017-09-30T12:27:52+5:30

इतकं धादांत खोटं बोलणारं सरकार आणि पंतप्रधान मी आजपर्यंत कधीच पाहिलेलं नाही अशी बोचरी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. एल्फिन्स्टन आणि परळ ब्रिजवरील दुर्घटनेच्या पार्श्वभुमीवर राज ठाकरे यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर सडेतोड टीका केली. 

Raj Thackeray's remarks on Modi have not seen such a false speaker | इतकं खोटं बोलणारा पंतप्रधान कधी पाहिलेला नाही, राज ठाकरेंची मोदींवर बोचरी टीका

इतकं खोटं बोलणारा पंतप्रधान कधी पाहिलेला नाही, राज ठाकरेंची मोदींवर बोचरी टीका

googlenewsNext

मुंबई - इतकं धादांत खोटं बोलणारं सरकार आणि पंतप्रधान मी आजपर्यंत कधीच पाहिलेलं नाही अशी बोचरी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. एल्फिन्स्टन आणि परळ ब्रिजवरील दुर्घटनेच्या पार्श्वभुमीवर राज ठाकरे यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर सडेतोड टीका केली. 

सरकार आपली आश्वासनं पुर्ण करत नाही आहे असं वाटतं का ? विचारलं असता राज ठाकरे बोलले की, 'हे खोटं बोलूनच सत्तेवर आले आहेत. सगळा सोशल मीडिया पाहिल्यावर लक्षाय येतं की निवडणुकीआधी काय बोललेत आणि नंतर काय बोलतायत. इतकं धादांत खोटं बोलणारं सरकार आणि पंतप्रधान मी कधीच पाहिलेलं नाही. आणि या सगळ्याचा शेवट काय असणार तर अमित शहा येणार आणि म्हणणार हा चुनावी जुमला आहे'. 

बुलेट ट्रेनला विरोध केल्याने सुरेश प्रभूंना हटवलं 
यावेळी राज ठाकरेंनी माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचं कौतुक केलं. बुलेट ट्रेनला विरोध केल्याने त्यांना हटवण्यात आल्याची टीका राज ठाकरेंनी केली. 'सुरेश प्रभू चांगलं काम करत होते. त्यांना का हटवलं कळलं नाही. इमाने इतबारे तो माणूस चांगलं काम करत होता. आयत्या वेळेला यांच्या बुलेटच्या ट्रेनच्या लाडापायी सुरेश प्रभूंना हटवण्यात आलं. पियूष गोयल काय आधी टीसी होते', असं राज ठाकरे बोलले आहेत. 

मुंबईत बुलेट ट्रेनची एकही विट रचू दिली जाणार नाही
मुंबईमध्ये बुलेट ट्रेनची एकही वीज रचली जाणार नाही, असा थेट इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. मुंबईमध्ये रस्त्यांवर लोकांना चालणं मुश्किल मग बुलेट ट्रेन कशाला? असा सवालही राज ठाकरे यांनी विचारला. मुंबईत बुलेट ट्रेनचं काम करण्यासाठी जर कोणी अरेरावी करणार असेल, तर त्याला आम्हीही तसंच उत्तर देऊ, असंही राज ठाकरे यांनी म्हंटलं आहे. आपल्याकडे आहेत त्या गोष्टी होत नाहीत. आणि नवीन गोष्टी सरकारकडून आणल्या जात असल्याची टीका राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली आहे. मुंबईमधील रेल्वे स्टेशन आणि ट्रेनची परिस्थिती जोपर्यंत सुधारली जाणार नाही तोपर्यंत बुलेट ट्रेनची एकही वीट रचली जाणार नाही. मोदींनी हवी तर गुजरात मध्येच बुलेट ट्रेन चालवावी असं यावेळी राज ठाकरेंनी सांगितलं.

पाच तारखेला चर्चगेला मनसेचा मोर्चा 
एल्फिन्स्टन स्टेशनवर घडलेल्या घटनेबद्दल राज ठाकरे यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. ही घटना दुर्दैवी आहे असं राज ठाकरे यांनी म्हंटलं आहे. या दुर्घटनेच्या निषेधार्थ राज ठाकरे 5 ऑक्टोबर रोजी चर्चगेटमधील पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयावर  मोर्चा काढणार आहेत. या मोर्चामध्ये राज ठाकरे स्वतः सहभाग घेणार असून मुंबईकरांनीसुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन राज ठाकरेंनी केलं आहे. 5 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मोर्चातून सरकारला त्यांच्या कामाबद्दल जाब विचारणार असल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हंटलं आहे.

किरीट सोमय्यांवर साधला निशाणा
पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरेंनी भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांच्यावरही टीका केली आहे. सुरूवातीला रेल्वेची उंची मोजणारे किरीट सोमय्या आता गप्प का? साडेतीन वर्षापासून ते गप्प आहेत, सत्ता आल्यावर आधी पाठपुरावा करणारे आता झोपले, असं राज ठाकरेंनी म्हंटलं आहे. विरोधी पक्षात असताना किरीट सोमय्या ईव्हीएम मशिनच्या मुद्द्यावर सडकून टिका करत होते, आता ते गप्प का? असा सवाल राज ठाकरेंनी केला आहे.

परप्रांतियांमुळे पायाभूत सुविधांना बोजवारा
मुंबईमध्ये परप्रांतियांचे लोंढे येणं काही थांबत नाही. दररोज हजारो लोक मुंबईत येतात. त्यामुळे आधीच कोसळलेल्या पायाभूत सोयीसुविधा अपूऱ्या पडत असल्याचं मत राज ठाकरेंनी व्यक्त केलं आहे. 

मुंबईत माणसं मारायला दहशवादी कशाला हवेत?
मुंबईमध्ये दररोज काही ना काही घडल्याचं ऐकायला मिळतं. अनेक लोक मारले जातात. मुंबईतील माणसं मारायला आपलीच माणसं काफी आहेत. त्यासाठी पाकिस्तानातीला दहशतवादी किंवा चीनची काय गरज, अशी घणाघाती टीका राज ठाकरे यांनी केली आहे. 
 

Web Title: Raj Thackeray's remarks on Modi have not seen such a false speaker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.