मोठी बातमी! निवडणूक आयोग EVM मशीनला 'पाडू' नावाचे नवीन डिव्हाइस जोडणार; राज ठाकरेंच्या आरोपाने नव्या वादाला फोडणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 12:52 IST2026-01-14T12:49:55+5:302026-01-14T12:52:21+5:30
Raj Thackeray, Uddhav Thackeray Urgent PC 2026: राज्याच्या राजकारणात आज एक मोठी खळबळ उडाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'शिवतीर्थ' निवासस्थानी तातडीची संयुक्त पत्रकार परिषद घेऊन भारतीय निवडणूक आयोगावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.

मोठी बातमी! निवडणूक आयोग EVM मशीनला 'पाडू' नावाचे नवीन डिव्हाइस जोडणार; राज ठाकरेंच्या आरोपाने नव्या वादाला फोडणी
मुंबई: राज्याच्या राजकारणात आज एक मोठी खळबळ उडाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'शिवतीर्थ' निवासस्थानी तातडीची संयुक्त पत्रकार परिषद घेऊन भारतीय निवडणूक आयोगावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. "निवडणूक आयोग पारदर्शक राहिलेला नाही, ते सत्ताधाऱ्यांचे गुलाम झाले आहेत," अशा शब्दांत राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला.
राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत खळबळजनक दावा केला की, निवडणूक आयोग EVM मशीनला एक नवीन 'डिव्हाइस' (उपकरण) जोडणार आहे. या तांत्रिक बदलाबाबत आयोगाने कोणत्याही राजकीय पक्षाला विश्वासात घेतलेले नाही किंवा तशी पूर्वकल्पना दिलेली नाही. हे नवीन मशीन नेमके दिसते कसे, याचे काम काय आणि ते ऐनवेळी का जोडले जात आहे, याचे उत्तर आयोगाकडे नाही," असे राज ठाकरे म्हणाले.
प्रचाराचा दिवस संपल्यानंतर दुसरा दिवस रिकामा, नंतरच्या दिवशी मतदान असते. आजपर्यंतच्या निवडणुका अशाच पार पडल्या. या सरकारला काय हवेय यासाठी निवडणूक आयोग जे काम करतेय. काल नवीन नोटीफिकेशन काढले, तुम्ही पाच वाजेपर्यंत मतदारांना भेटू शकता. ही आताच कशासाठी आली, का आली. विधानसभेला का आली नाही, भेटू शकता परंतू पत्रके वाटू शकत नाही. म्हणजे पैसे वाटू शकता, अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे.
प्रिटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट, पाडू नावाचे नवीन मशीन ईव्हीएमला जोडले जाणार आहे. हे नवीन काय युनिट आणले आहे ते आम्हाला माहिती नाही, जनतेलाही माहिती. हे दाखवावे, सांगावे यासाठी निवडणूक आयोग तयार नाहीय. वाघमारे त्यांना हवे ते करत आहेत. उद्धव ठाकरेंनी याबाबतचे पत्र पाठविले आहे. त्यावर ते बोलायला तयार नाही, असा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की ईव्हीएम जुनी झाली आहेत म्हणून ही नवीन मशीन जोडत आहोत, असे राज ठाकरे म्हणाले.