Join us  

अजित डोवाल यांना लक्ष्य करून राज ठाकरे चुकले?; FBवर प्रतिक्रियांचा पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2019 12:07 PM

पुलवामामधील शहीद जवान हे राजकीय बळी आहेत, अजित डोवाल या माणसाची चौकशी केल्यास सगळ्या गोष्टी बाहेर येतील, असा दावा राज ठाकरे यांनी केला होता.

ठळक मुद्देपुलवामा दहशतवादी हल्ल्यावरून राज ठाकरे यांनी रविवारी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर गंभीर आरोप केले.अजित डोवाल यांची प्रतिमा अत्यंत स्वच्छ आहे. धाडसी आणि चाणाक्ष अधिकारी म्हणूनच त्यांच्याकडे पाहिलं जातं.राज ठाकरेंच्या कॉमेंट्सवर नेटिझन्सने नाराजी व्यक्त केली आहे.

'तुमचा मोदीविरोध एकवेळ समजू शकतो. पण तुम्ही तर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल सर यांच्याकडेच संशयाची सुई ठेवत आहात. या माणसाने भरपूर मोहिमा यशश्वीरीत्या पार पाडल्या आहेत! पाकिस्तान मध्ये ग्राउंड लेव्हल ला जाऊन कामं केली आहेत....'ही आहे फेसबुकवरील एका वाचकाची प्रतिक्रिया. अशा शेकडो प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कालच्या एका विधानावर आल्यात. 

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यावरून राज ठाकरे यांनी रविवारी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर गंभीर आरोप केले. पुलवामामधील शहीद जवान हे राजकीय बळी आहेत, अजित डोवाल या माणसाची चौकशी केल्यास सगळ्या गोष्टी बाहेर येतील, असा दावा त्यांनी केला. त्यांचं हे विधान निश्चितच खळबळजनक होतं. कारण, अजित डोवाल यांची प्रतिमा अत्यंत स्वच्छ आहे. धाडसी आणि चाणाक्ष अधिकारी म्हणूनच त्यांच्याकडे पाहिलं जातं. पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने केलेल्या 'सर्जिकल स्ट्राइक'मध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची होती. डोकलाम वादाच्या वेळीही त्यांच्या कामाचं कौतुक झालं होतं. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा दबदबा निर्माण करण्यासाठी त्यांनी आखलेल्या रणनीतीचेही सकारात्मक पडसाद पाहायला मिळत आहेत. अजित डोवाल यांच्या मुलाचे पाकिस्तानातील उद्योगपतीशी व्यापारी संबंध असल्याची बातमी मागे आली होती. परंतु, तेव्हाही डोवाल यांची इमेज पाहून त्यांच्यावर फारशी टीका झाली नव्हती. असं असताना, राज ठाकरेंनी पुलवामा हल्ल्यावरून थेट त्यांच्यावरच निशाणा साधला. त्यासंबंधीची बातमी 'लोकमत'ने फेसबुकवर पोस्ट केल्यानंतर प्रतिक्रियांचा पाऊस पडला. त्यात, काही मनसैनिकांनाही राज यांचा हा आरोप पटला नसल्याचं दिसतंय. अर्थात काही शिलेदार त्यांच्या पाठीशी भक्कम उभे आहेत, पण बऱ्याच कॉमेंट्समध्ये राज ठाकरेंची 'शाळा' घेण्यात आलीय. त्यापैकी, दोन्ही बाजू मांडणाऱ्या काही प्रतिक्रिया...    

राज ठाकरेंच्या भूमिकेचं समर्थन करणाऱ्या प्रतिक्रिया....

टॅग्स :पुलवामा दहशतवादी हल्लाराज ठाकरेअजित डोवालनरेंद्र मोदी