Raj Thackeray: लोकांना वाटायचं हे "एकावर एक फ्री", राज ठाकरेंची मिश्कील फटकेबाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2022 03:57 PM2022-11-07T15:57:42+5:302022-11-07T16:01:46+5:30

मनसेप्रमुख राज ठाकरेचं भाषण ऐकायला सारेच उत्सुक असतात. राजकीय मैदान असो किंवा सांस्कृतिक कार्यक्रम ते नेहमीच आपल्या शैलीत प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजन करतात

Raj Thackeray: People thought it was ``one on one free'', Raj Thackeray's hard hitting on fadanvis and Eknath shinde meeting with raj | Raj Thackeray: लोकांना वाटायचं हे "एकावर एक फ्री", राज ठाकरेंची मिश्कील फटकेबाजी

Raj Thackeray: लोकांना वाटायचं हे "एकावर एक फ्री", राज ठाकरेंची मिश्कील फटकेबाजी

googlenewsNext

मुंबई - मराठमोळे अभिनेते प्रशांत दामले यांच्या नाटकाचा १२ हजार ५०० वा प्रयोग मुंबईतील षण्मुखानंद हॉल येथे उत्साहात पार पडला. या नाटकाच्या प्रयोगाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: प्रेक्षक म्हणून उपस्थित होते. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांचीही विशेष उपस्थिती होती. तर, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांनी आपल्या शैलीत धडाकेबाज फटकेबाजी केली. यावेळ, मुख्यमंत्री गुवाहटीतील नाट्यचे उदाहरण देताना आम्हीही काही दिवसांपूर्वी महानाट्य केलं, असे म्हणताच सभागृहात हशा पिकला. तर, राज ठाकरेंनीही मिश्कील फटकेबाजी केली. 

मनसेप्रमुख राज ठाकरेचं भाषण ऐकायला सारेच उत्सुक असतात. राजकीय मैदान असो किंवा सांस्कृतिक कार्यक्रम ते नेहमीच आपल्या शैलीत प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजन करतात. प्रशांत दामले यांच्या १२ हजार ५०० व्या नाटकाच्या प्रयोगाच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिल्यानंतरही त्यांनी मिश्कील फटकेबाजीने चाहत्यांना खळखळून हसवलं. निवडणुकांनंतर सर्वसामान्यांच्या हाती जे येतं तेच आज आमच्या हाती आलं, म्हणजे... घंटा... असे म्हणतात सभागृहात हशा पिकला. 


राज यांनी आपल्या भाषणात प्रशांत दामले यांच्या अभिनयाचं आणि रंगमंचावरील वावरणाऱ्या उर्जेचं कौतुक केलं. "असे कलावंत युरोपात जन्माला आले असते तर देशाचे पंतप्रधान ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले असते. पण आपल्याकडे प्रतिमा जपल्या जातात प्रतिभा नाही.", अशा शब्दात राज यांनी खंतही व्यक्त केली. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेतचा हा सगल तिसरा कार्यक्रम असल्याने याचीही संदर्भ देत मिश्कील टोला लगावला. दिपोत्सव, परवा सिनेमाचा शुभारंभ आणि आता तिसऱ्यांदा एकत्र येत आहोत. तुम्हाला वाटायचं हे एकावर एक फ्री आहेत की काय? एकाला बोलावलं की दुसरा येतोच, असे म्हणत राज यांनी सभागृह खळखळून हसवलं. 
 

Web Title: Raj Thackeray: People thought it was ``one on one free'', Raj Thackeray's hard hitting on fadanvis and Eknath shinde meeting with raj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.