Raj Thackeray ED Notice Live Updates Heavy police bandobast for Raj Thackeray's ED questioning today | Raj Thackeray ED Notice Live : अखेर राज ठाकरे ईडी कार्यालयाबाहेर आले
Raj Thackeray ED Notice Live : अखेर राज ठाकरे ईडी कार्यालयाबाहेर आले

मुंबई - कोहिनूर मिल कर्ज प्रकरणातील अनियमिततेबाबत मनसेप्रमुख राज ठाकरे हे आज सक्तवसुली संचालनालयाच्या चौकशीला सामोरे जात आहेत. या कारवाईमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मुंबईत चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कृष्णकुंज परिसर आणि दक्षिण मुंबईत ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे. तसेच ईडी कार्यालयाच्या परिसरात मनसेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी करु नये, यासाठी मनसेच्या प्रमुख पदाधिकारी व मनसैनिकांना उपस्थित न राहण्यासाठी नोटीस बजाविल्या आहेत. 

LIVE

Get Latest Updates

05:39 PM

राज ठाकरेंची गेल्या सहा तासांपासून ईडीकडून चौकशी सुरू

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची गेल्या सहा तासांपासून ईडीकडून चौकशी सुरूच आहे. मनसैनिकांनी ईडीच्या कार्यालयाच्या परिसरात गर्दी केली असून राज यांचे कुटुंबीयही ग्रँड हॉटेलमध्ये सकाळपासून थांबून आहेत. 

05:32 PM

उल्हासनगरात सरकारच्याविरोधात मनसे पदाधिकाऱ्यांचे आंदोलन; पोलिसांनी केली अटक

उल्हासनगरात सरकारच्याविरोधात मनसे पदाधिकाऱ्यांचे आंदोलन; पोलिसांनी केली अटक

04:14 PM

राज ठाकरे यांच्या आदेशामुळे नाशकात मनसैनिकांची शांतता

राज ठाकरे यांच्या आदेशामुळे नाशकात मनसैनिकांची शांतता

03:35 PM

कल्याणमध्ये बाजारपेठ बंद करण्यात आली

कल्याणातील काही मनसे पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची तर काही जणांना नजरकैदेत ठेवल्याची प्राथमिक माहिती.

पश्चिमेतील बेतूरकर पाडा परिसरातील दुकानेही बंद करण्यात आली आहेत.

03:10 PM

राज ठाकरे तीन तासांपासून ईडी कार्यालयात, अद्याप चौकशी सुरूच!

02:52 PM

कौटुंबिक वात्सल्य आणि नाती हे आमचे संस्कार, 'त्या' ट्विटवरून मनसेचा दमानियांना टोला

02:52 PM

इंदिरा गांधींबाबतही हेच घडलं, ईडीवरुन आव्हाड म्हणाले

02:45 PM

'ईडीयट हिटलर'! ईडीच्या चौकशीवरून मनसेचा टोला!

02:30 PM

राज ठाकरेंचे कुटुंबीय हॉटेलमधून बाहेर, ईडी चौकशी अद्याप सुरूच!

02:25 PM

राज ठाकरेंची चौकशी सात वाजेपर्यंत चालणार

मुंबई - ईडीकडून राज ठाकरेंची आजची चौकशी सात वाजेपर्यंत चालणार, तीन अधिकाऱ्यांकडून राज यांच्याकडे सविस्तर विचारणा, सूत्रांची माहिती

02:19 PM

गुन्हा केला नसेल तर चौकशीला निडरपणे सामोरे जावे - संजय राऊत

02:07 PM

राज ठाकरेंच्या कुटुंबीयांच्या पाठिशी सुप्रिया'ताई', दमानियांच्या टिकेला प्रत्युत्तर

01:43 PM

आईचा आशीर्वाद, 'दादू'च्या शुभेच्छा अन् 9 नंबरची कार राज ठाकरेंसाठी 'लकी' ठरणार?

01:37 PM

ठाणे मनसे पदाधिकारी महेश कदम यांना ताब्यात घेतले. महेश यांनी राज ठाकरे यांचा मुखवटा घालून आणि “होय मी राज भक्त” टीशर्ट घालून निषेध केला आहे.

01:22 PM

चौकशी पक्षाच्या प्रमुखाची नसून एका व्यवसायाची आहे - सुधीर मुनगंटीवार

01:11 PM

कळवा पोलिसांनी मनसे पदाधिकाऱ्यांना घेतलं ताब्यात

ठाणे  -  ठाणे उपशहर अध्यक्ष सुशांत सुर्यराव, कळवा/मुंब्रा विधानसभा विभाग अध्यक्ष महेश साळवी, कळवा/मुंब्रा विधानसभा सचिव संजोग शिळकर, राज्य चिटणीस-जनहित कक्ष मोहनसिंह चौहान, विद्यार्थीसेना उपशहर अध्यक्ष दिपक शिंदे, प्रभाग अध्यक्ष राजेश शिळकर, प्रभाग अध्यक्ष स्वप्नील वाघोळे, प्रभाग अध्यक्ष दिलीप धुळे, मनोज कोनकर, गणेश रहाटे, अभिजित संमेळ, गजानन डोंगरे, राकेश पेडणेकर यांना कळवा पोलिसांनी घेतलं ताब्यात

12:55 PM

ठाणे शहर उपाध्यक्ष विश्वजित जाधव यांना देखील राबोडी पोलिसांनी घेतले ताब्यात

12:43 PM

सरकारने महाराष्ट्रात दडपशाही सुरू केली आहे - अविनाश जाधव

12:33 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडी कार्यालयात चौकशी सुरू

12:21 PM

मनसैनिकांचा नवा फंडा; 'टी-शर्ट मेसेज'मधून मोदी सरकारला हल्ला

12:15 PM

'राज ठाकरे ईडी चौकशीला निघालेत की सत्यनारायणाच्या पूजेला?'

11:56 AM

मुंबईतील काही भागांमध्ये जमावबंदीचा आदेश लागू


11:37 AM

मुंबईतील  एमआरए मार्ग पोलीस ठाणे, आझाद मैदान पोलीस ठाणे, दादर पोलीस ठाणे आणि मरीन ड्राईव्ह या पोलीस ठाण्याच्या हद्दीत कलम 144 लागू करण्यात आलं आहे.

11:34 AM

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे ईडी कार्यालयात पोहोचले

11:27 AM

राज ठाकरे कृष्णकुंज येथून ईडी कार्यालयाकडे रवाना

11:19 AM

... तर शांत बसणार नाही, अविनाश जाधव यांचा सरकारला इशारा

11:02 AM

मनसे वाहतूक सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष आशिष डोके, मनसे ठाणे शहर सचिव रवींद्र सोनार, मनसे प्रभागध्यक्ष विनायक रणपिसे यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

10:47 AM

सरकारला परिणाम भोगावे लागतील

राज साहेबांसोबत अनुचित प्रकार घडला तर सरकारला परिणाम भोगावे लागतील - अविनाश जाधव 

10:37 AM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे सहकुटुंब ईडी कार्यालयाकडे रवाना

10:32 AM

ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव देखील नौपाडा पोलिसांच्या ताब्यात

10:27 AM

मुंबई : राज ठाकरे सकाळी 11 वाजता ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार

10:27 AM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे आणि सुपुत्र अमित ठाकरे हे राज ठाकरे यांच्यासोबत ईडीच्या कार्यालयात जाणार. 

10:23 AM

ठाणे : मनसे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांना कोपरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

10:18 AM

मुंबई : ईडी कार्यालयाच्या परिसरात चोख पोलीस बंदोबस्त.

09:53 AM

राज ठाकरे ईडीच्या चौकशीला सामोरे जाणार, मुंबईत चोख पोलीस बंदोबस्त

09:42 AM

मुंबई : सरकार आणि ईडीचा निषेध म्हणून संदीप देशपांडे यांनी काळ्या रंगाचं 'EDiot Hitler' लिहिलेलं टी-शर्ट परिधान केलं आहे.

09:34 AM

मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे पोलिसांच्या ताब्यात

09:18 AM

भाऊ झाला पाठीराखा; राज ठाकरेंच्या ईडी नोटीशीवर उद्धव ठाकरे बोलले!

09:12 AM

मुंबई : मनसे पदाधिकाऱ्यांची पोलिसांकडून धरपकड सुरू

09:03 AM

राज ठाकरे यांच्या ईडी चौकशीमुळे मुंबईत पोलीस बंदोबस्तात वाढ

08:54 AM

मुंबईत चोख पोलीस बंदोबस्त

मुंबई : कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मुंबईत चोख पोलीस बंदोबस्त, कृष्णकुंज परिसर आणि दक्षिण मुंबईत ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त

08:44 AM

मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी धाडल्या नोटीस

08:35 AM

कार्यकर्त्यांनो, कोणीही टोकाचं पाऊल उचलू नका; राज ठाकरेंनी केली कळकळीची विनंती

08:27 AM

राज ठाकरे आज जाणार ईडीच्या चौकशीला सामोरे

English summary :
Raj Thackeray's ED Notice Live Update: MNS chief Raj Thackeray is facing ED inquiry today on irregularities in the Kohinoor mill loan case. The police has been kept security in Mumbai and special security near Raj Thackeray's home (krishnakunj).


Web Title: Raj Thackeray ED Notice Live Updates Heavy police bandobast for Raj Thackeray's ED questioning today
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.