Raj Kundra: पोर्नोग्राफी कंटेंटमधून राज कुंद्रा दिवसातून लाखो रुपये कमावायचा; जाणून घ्या रोजचे उत्पन्न!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 01:28 PM2021-07-21T13:28:23+5:302021-07-21T13:34:02+5:30

हॉटशॉट डिजीटल प्लॅटफॉर्मवर (HotShots App) पॉर्न सिनेमे टाकून राज कुंद्रा लाखो रुपये कमवत होता.

Raj Kundra was making lakhs of rupees by posting porn movies on hot shots digital platform. | Raj Kundra: पोर्नोग्राफी कंटेंटमधून राज कुंद्रा दिवसातून लाखो रुपये कमावायचा; जाणून घ्या रोजचे उत्पन्न!

Raj Kundra: पोर्नोग्राफी कंटेंटमधून राज कुंद्रा दिवसातून लाखो रुपये कमावायचा; जाणून घ्या रोजचे उत्पन्न!

Next

मुंबई : सिनेअभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा याच्या अटकेपाठोपाठ कुंद्रा याच्या कंपनीचा आयटीतज्ज्ञ रायन थॉर्प याला नेरूळमधून अटक करण्यात आली आहे. दोघांना मंगळवारी न्यायालयाने २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यात कुंद्रा हा पोर्न चित्रपट तयार करणाऱ्या टोळीचा मुख्य सूत्रधार असून, व्हॉट्सॲपवरून याचे कामकाज सांभाळत असल्याचे तपासात समोर आले आहे.

सदर प्रकरणात मालमत्ता कक्षाने आतापर्यंत एकूण ११ आरोपींना अटक केली आहे. फेब्रुवारीमध्ये अटक करण्यात आलेल्या उमेश कामतच्या चौकशीत कुंद्रा कनेक्शन उघडकीस आले. कामत हा कुंद्रा याच्या विआन इंडस्ट्रियल इस्टेट कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर आहे. कामतने गुन्हे शाखेला दिलेल्या माहितीत, लंडनस्थित असलेल्या केनरिन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मालक प्रदीप बक्षी हे असून, ते राज कुंद्रा याचे नातेवाईक आहेत.

हॉटशॉट डिजीटल प्लॅटफॉर्मवर (HotShots App) पॉर्न सिनेमे टाकून राज कुंद्रा लाखो रुपये कमवत होता. हॉटशॉटकडून राज कुंद्रा आणि त्याच्या कंपनीत लाखो रुपये ट्रान्सफर होत होते. २२ डिसेंबर २०२० ते ३ फेब्रुवारी २०२१ दरम्यान पैसे ट्रान्सफर झाल्याचे डिटेल्स समोर आले आहेत.  एका मराठी वृत्तावाहिनीच्या वृत्तानूसार, राज कुंद्रा डिजिटल प्लॅटफॉर्मवर सॉफ्ट पॉर्नोग्राफी शेअर करुन दिवसातून लाखो रुपये कमवत असल्याची माहिती समोर आली आहे. बँकेच्या तपशिलात असे दिसून आले आहे की, हॉटशॉट्सवरून राज कुंद्रा आणि त्याच्या कंपनीला आतापर्यंत लाखो रुपये वर्ग करण्यात आले आहेत.

बँक ट्रान्सफरचे डिटेल्स-

  • २२ डिसेंबर २०२० रोजी XX790 खात्यात HotHit च्या खात्यातून ३ लाख रुपये आले.
  • २५ डिसेंबर २०२० रोजी एक्सएच 790 खात्यात HotHitच्या खात्यातून १ लाख रुपये आले.
  • २६ डिसेंबर २०२० रोजी XX790 खात्यात HotHitच्या खात्यातून १० लाख रुपये आले.
  • २८ डिसेंबर २०२० रोजी एक्सएक्स 790 खात्यात HotHitच्या खात्यातून ५० हजार रुपये आले.
  • ३ जानेवारी २०२१ रोजी एक्सएच 790 खात्यात HotHitच्या खात्यातून २ लाख ५ हजार रुपये आले.
  • १० जानेवारी, २०२१ रोजी एक्सएक्स 790 खात्यात HotHitच्या खात्यातून ३ लाख रुपये आले.
  • १३ जानेवारी २०२१ रोजी XX790 खात्यात हॉटहिटच्या खात्यातून २ लाख रुपये आले.
  • २० जानेवारी २०२१ रोजी XX790 खात्यात HotHitच्या खात्यातून १ लाख रुपये आले.
  • २३ जानेवारी २०२१ रोजी XX790 खात्यात HotHitच्या खात्यातून ९५ हजार रुपये आले.
  • ३ फेब्रुवारी २०२१ XX790 खात्यात HotHitच्या खात्यात २ लाख ७० हजार रुपये जमा झाले.

 

कुंद्रा याचे व्हॉट्सॲप चॅट व्हायरल

कुंद्रा याची पोलीस कोठडीत रवानगी होताच त्याच्या व्हॉट्सॲप ग्रुपवरील चॅट सोशल मीडियावर व्हायरल झाले. यात प्रदीप बक्षीसोबत आर्थिक व्यवहार, कलाकारांच्या रखडलेल्या पैशांचाही उल्लेख आहे. यात एकूण ८१ कलाकारांचे पैसे देण्याचे बाकी राहिल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Raj Kundra was making lakhs of rupees by posting porn movies on hot shots digital platform.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app