Raj Kundra: पोर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्रासह पत्नी शिल्पा शेट्टीचाही सहभाग?; पोलिसांनी वर्तवली शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 02:31 PM2021-07-21T14:31:54+5:302021-07-21T14:35:24+5:30

राज कुंद्रा याच्या जवळपास २३ कंपन्यांमध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टी भागीदार आहे.

Raj Kundra: Actress Shilpa Shetty is a partner in about 23 companies of Raj Kundra. | Raj Kundra: पोर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्रासह पत्नी शिल्पा शेट्टीचाही सहभाग?; पोलिसांनी वर्तवली शक्यता

Raj Kundra: पोर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्रासह पत्नी शिल्पा शेट्टीचाही सहभाग?; पोलिसांनी वर्तवली शक्यता

Next

मुंबई : सिनेअभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा याच्या अटकेपाठोपाठ कुंद्रा याच्या कंपनीचा आयटीतज्ज्ञ रायन थॉर्प याला नेरूळमधून अटक करण्यात आली आहे. दोघांना मंगळवारी न्यायालयाने २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यात कुंद्रा हा पोर्न चित्रपट तयार करणाऱ्या टोळीचा मुख्य सूत्रधार असून, व्हॉट्सॲपवरून याचे कामकाज सांभाळत असल्याचे तपासात समोर आले आहे.

सदर प्रकरणात मालमत्ता कक्षाने आतापर्यंत एकूण ११ आरोपींना अटक केली आहे. फेब्रुवारीमध्ये अटक करण्यात आलेल्या उमेश कामतच्या चौकशीत कुंद्रा कनेक्शन उघडकीस आले. कामत हा कुंद्रा याच्या विआन इंडस्ट्रियल इस्टेट कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर आहे. कामतने गुन्हे शाखेला दिलेल्या माहितीत, लंडनस्थित असलेल्या केनरिन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मालक प्रदीप बक्षी हे असून, ते राज कुंद्रा याचे नातेवाईक आहेत.

सध्या राज कुंद्राची कसून चौकशी केली जात आहे. या चौकशीतून अनेक नवनवे खुलासे होत आहेत. याचदरम्यान पोलिसांनी देखील एक महत्वाची माहिती दिली आहे. सदर प्रकरणात राज कुंद्राची पत्नी शिल्पा शेट्टीची देखील चौकशी होऊ शकते, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. राज कुंद्राच्या ज्या ज्या कंपन्या आहेत, त्यात अभिनेत्री शिल्पा शेट्टी सुद्धा भागीदार आहे. त्यामूळे त्याच्या कंपनीतून सुरू असलेल्या या रॅकेटमध्ये शिल्पा शेट्टीचा समावेश आहे का? यावर अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. 

राज कुंद्रा याच्या जवळपास २३ कंपन्यांमध्ये शिल्पा शेट्टी भागीदार आहे. यात ज्या कंपनीमधून हा सर्व प्रकार सुरू होता त्या व्हिआन कंपनीत सुद्धा अभिनेत्री शिल्पा शेट्टी भागीदार आहे. त्यामूळे या प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा सुद्धा सहभाग असू शकतो, अशी शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येते आहे. ज्या अ‍ॅपच्या माध्यमातून अश्लील क्लिप विकण्याचा प्रकार सुरू होता, अशाच प्रकारचा आणखी एक अ‍ॅप 'जेएल ५०' याचं सोशल मीडिया ब्रॅण्डींग देखील शिल्पा शेट्टीनं केलं होतं. त्यामूळे राज कुंद्राच्या अटकेनंतर तिला सुद्धा चौकशीसाठी बोलवण्यात येणार असल्याची शक्यता आहे. 

पोलिसांनी अगदी बारकाईने आपला तपास सुरू केला असून अद्याप शिल्पा शेट्टीविरोधात कोणतेही पुरावे सापडले नसल्याचे देखील पोलिसांकडून सांगण्यात आलंय. सध्या तरी या प्रकरणात  शिल्पा शेट्टीचा कोणताही सक्रिय सहभाग निदर्शनास आलेला नाही, असं देखील पोलिसांनी सांगितलं आहे. त्याचप्रमाणे पीडितांनी पुढे येऊन गुन्हे शाखेशी संपर्क साधावा, असं आवाहन देखील पोलिसांकडून करण्यात आलं आहे. 

दरम्यान, राज कुंद्रा याची पोलीस कोठडीत रवानगी होताच त्याच्या व्हॉट्सॲप ग्रुपवरील चॅट सोशल मीडियावर व्हायरल झाले. यात प्रदीप बक्षीसोबत आर्थिक व्यवहार, कलाकारांच्या रखडलेल्या पैशांचाही उल्लेख आहे. यात एकूण ८१ कलाकारांचे पैसे देण्याचे बाकी राहिल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Raj Kundra: Actress Shilpa Shetty is a partner in about 23 companies of Raj Kundra.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app