मुंबईत आठवडाभर राहणार पावसाचा जोर, खबरदारीचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2018 05:52 AM2018-07-06T05:52:57+5:302018-07-06T05:52:57+5:30

गेल्या दोन दिवसांपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. दरम्यान, हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईत पुढचा आठवडाभर जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Rainfall, caution warning will remain in Mumbai for a week | मुंबईत आठवडाभर राहणार पावसाचा जोर, खबरदारीचा इशारा

मुंबईत आठवडाभर राहणार पावसाचा जोर, खबरदारीचा इशारा

googlenewsNext

मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. दरम्यान, हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईत पुढचा आठवडाभर जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून पुढचा आठवडाभर सक्रिय राहणार आहे. त्यामुळे याचा रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे खबरदारीचा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, गेल्या २ दिवसांत मुंबईत २ जण मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्या. पहिल्या घटनेत बुधवारी दुपारी २ वाजता माहिम पश्चिमेकडील दर्गाजवळ एक अनोळखी मृतदेह पाण्यात तरंगताना आढळला. या मृतदेहाची ओळख पटली नसून याचं वय अंदाजे ४५ वर्ष आहे. अग्निशामक दलाच्या जवानांनी सदर मृतदेह सायन रुग्णालयात पाठवला. दुसऱ्या घटनेत मंगळवारी रात्री ९.५०ला पवईतील आरे रोडवर असणाºया भांबुर गावातील साई बांगुर्डा तलावात बुडून सूरज सावंत या २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. या मुलाचा मृतदेह बुधवारी संध्याकाळी स्थानिकांनी तलावाबाहेर काढला. या तरुणाच्या मृत्यूबाबत स्थानिक पोलीस तपास करीत आहेत.
गुरुवारी मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरांत ठिकठिकाणी सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू होता. दुपारनंतर पावसाचा वेग थोडा मंदावला. तर, माटुंगा, सायनसह कुर्ला, विद्याविहार, घाटकोपर परिसरात पावसाचा जोर कायम राहिला. पश्चिम उपनगरात बोरीवली, कांदिवली, अंधेरी, विलेपार्ले आणि वांद्रे येथेही संततधार सुरूच होती.

मध्य, हार्बर उशिराने
मुसळधार पावसामुळे मध्य-हार्बर लोकलला फटका बसल्याने लोकल फेºया १० ते १५ मिनिटे उशीराने धावत होत्या. पावसाच्या इशा-यामुळे मध्य रेल्वेने एक्स्प्रेस रद्द केल्या. अंधेरी दुर्घटनेमुळे पश्चिम रेल्वेचा वेग संथ आहे. हार्बर मार्गावरील लोकल सुमारे १५ मिनिटे उशिराने धावत होत्या. दुपारच्या सत्रात पावसाने उघडीप दिली. मात्र, त्याकाळातही लोकल फेºया काहीशा विलंबाने धावत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी होती.

Web Title: Rainfall, caution warning will remain in Mumbai for a week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.