Rain Update : मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाची उघडझाप सुरू आहे. दरम्यान, २७ ऑगस्टपासून गणेशोत्सव सुरू होणार आहे. या वर्षी ऐन गणेश उत्सवात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. २६ ऑगस्ट ते २९ ऑगस्टपर्यंत राज्यातील काही भागांत मुसळधार पाऊस सुरू होणार आहे.
२६ ते २९ ऑगस्ट, मुंबई, ठाणे यासह आयएमडी मॉडेल आणि अंदाजानुसार कोकण आणि घाट भागात काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. २९ ऑगस्ट रोजी राज्याच्या अंतर्गत भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
पुढील ७ दिवसांत कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे, तर २६ ऑगस्ट रोजी कोकणात खूप मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
संथगतीने पडणारा आणि दुसऱ्या तसेच शेवटच्या टप्प्यातील 'मघा' नक्षत्रातील पाऊस उद्या, मंगळवार, (दि. २६) ते शुक्रवार (दि. २९) म्हणजे हरतालिका ते ऋषीपंचमी या चार दिवसांत सक्रिय होण्याची शक्यता हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून काहीसाच सक्रिय होऊन, मध्यम पावसाची शक्यता आहे. विशेषतः हा पाऊसकोकणासह सह्याद्रीच्या पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पडण्याची शक्यता अधिक असल्याचा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.