रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 21:19 IST2025-09-28T21:19:00+5:302025-09-28T21:19:28+5:30
रविवारी जसई यार्ड मध्ये हा प्रयोग यशस्वीरीत्या पार पडला

रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मध्य रेल्वे इंजिनला डिझेल भरण्यासाठी आता शेड मध्ये जाण्याची गरज लागणार नाही आहे. कारण मध्य रेल्वेने इंजिनमध्ये डिझेल भरण्यासाठी टॅंकरचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. रविवारी जसई यार्ड मध्ये हा प्रयोग यशस्वीरीत्या पार पडला असून यामुळे वेळ आणि इंधनाची बचत होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
रेल्वेच्या इंजिनमध्ये सुमारे चार हजार लिटर इंधन भरावे लागते. एवढ्या मोठया प्रमाणात इंधन पुरवठा करण्यासाठी पारंपरिक पद्धतीने रेल्वे यार्ड मध्ये असलेल्या पंपाच्या माध्यमातून केले जाते. ट्रेनचे इंधन संपल्यावर तिला यार्ड मध्ये नेऊन पुन्हा स्टेशनवर येण्यासाठी मोठ्या प्रमाणात वेळेचा आणि इंधनाचा देखील अपव्यव होतो. त्यामुळे मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने टँकरच्या साहाय्याने इंधन भरण्यास सुरुवात केली आहे. या अगोदर मध्य रेल्वेच्या भुसावळ आणि नागपूर विभागामध्ये हा या अगोदर यशस्वीरीत्या ही पद्धत अवलंबण्यात येत आहे. आता मुंबई विभागात जसई यार्ड मध्ये हा प्रयोग यशस्वी झाला असून हळू हळू सर्व ठिकाणी असे उपलब्ध करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.