प्रकाश आंबेडकर यांच्यावर तातडीने बायपास सर्जरी, मेडीकल बुलेटीन जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2021 12:43 PM2021-07-09T12:43:55+5:302021-07-09T12:45:38+5:30

प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून 3 महिने दूर राहत असल्याची घोषणा केली होती. मात्र, सुट्टीचे कारण स्पष्ट न केल्याने विविध तर्क लढविले जात असून, त्यांच्या आरोग्याबाबतही चिंता व्यक्त होत होती

Prompt issuance of bypass surgery and medical bulletin on Prakash Ambedkar by vanchit bahujan aghadi | प्रकाश आंबेडकर यांच्यावर तातडीने बायपास सर्जरी, मेडीकल बुलेटीन जारी

प्रकाश आंबेडकर यांच्यावर तातडीने बायपास सर्जरी, मेडीकल बुलेटीन जारी

Next
ठळक मुद्देवंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर 8 जुलै रोजी तातडीने बायपास सर्जरी करण्यात आली आहे. ते सध्या ICU मध्ये आहेत, त्यांची प्रकृती स्थिर असून काळजीचे कारण नाही असे डॉक्टरानीं कळविले आहे

मुंबई - वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी तीन महिन्यांच्या सुट्टीवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे आंदोलन आणि निवडणुकीचा कार्यक्रम सुरळीत सुरू राहावा यासाठी रेखा ठाकूर यांच्याकडे पक्षाच्या प्रभारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. आंबेडकर यांच्या घोषणेनंतर अनेकांना प्रश्न पडले होता. आता, प्रकाश आंबडेकर यांच्यावर तातडीने बायपास सर्जरी झाल्याची माहिती प्रभारी अध्यक्षा रेखा ठाकूर यांनी दिली आहे.   

प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून 3 महिने दूर राहत असल्याची घोषणा केली होती. मात्र, सुट्टीचे कारण स्पष्ट न केल्याने विविध तर्क लढविले जात असून, त्यांच्या आरोग्याबाबतही चिंता व्यक्त होत होती. दरम्यान, आंबेडकर यांची प्रकृती स्थिर असून, शुक्रवारी हेल्थ बुलेटीन देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानुसार, आज मेडिकल बुलेटीन जाहीर करण्यात आले आहे. 


वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर 8 जुलै रोजी तातडीने बायपास सर्जरी करण्यात आली आहे. ते सध्या ICU मध्ये आहेत, त्यांची प्रकृती स्थिर असून काळजीचे कारण नाही असे डॉक्टरानीं कळविले आहे. अजून काही दिवस त्यांना हॉस्पिटलमध्येच ठेवण्यात येईल, असे मेडिकील बुलेटीनमध्ये म्हटले आहे. तसेच, त्यांच्या प्रकृतीसंदर्भातील अपडेट वंचित बहुज आघाडीच्या सोशल मीडियातून देण्यात येईल, असेही वंचित बहुजन आघाडीच्या प्रभारी अध्यक्षा रेखा ठाकूर यांनी व्हिडिओतून सांगितले आहे. 

व्हिडिओतून काय म्हणाले आंबेडकर

आंबेडकर यांनी व्हिडिओद्वारे आपल्या सुट्टीची घोषणा केली होती. पाच जिल्ह्यांमध्ये निवडणूक आहेत. ठिकठिकाणी आंदोलनेही सुरू आहे. रेखा ठाकूर यांच्याकडे प्रभारी पद देण्यात आले असून, अरुण सावंत आणि जिल्हा कमिटी त्यांना सहकार्य करतील, असे आंबेडकर म्हणाले. 
 

Web Title: Prompt issuance of bypass surgery and medical bulletin on Prakash Ambedkar by vanchit bahujan aghadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.