पशुधन विकास मंडळातील २ कोटी ४८ लाख रुपयांची साहित्य खरेदी संशयास्पद; आ. काशिनाथ दातेंची विधानसभेत लक्षवेधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 18:28 IST2025-07-03T18:27:48+5:302025-07-03T18:28:14+5:30
डॉ सतीश राजु तातडीने कार्यमुक्त

पशुधन विकास मंडळातील २ कोटी ४८ लाख रुपयांची साहित्य खरेदी संशयास्पद; आ. काशिनाथ दातेंची विधानसभेत लक्षवेधी
मुंबई-पशुधन विकास महामंडळातील मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सतिश राजू यांनी जनावरांचे कृत्रिम रेतन, गर्भधारणा तपासणी, वंध्यत्व तपासणीसाठी वापरण्यात येणारे ४८ लाख ९९ हजार प्लास्टिक हातमोजे खरेदी करताना २ कोटी ४८ लाख रुपये खरेदी धोरण नियमांचे उल्लंघन करून खर्च करण्यात आले आहे. पशुधन विकास मंडळातील २ कोटी ४८ लाख रुपयांची साहित्य खरेदी संशयाच्या भोवऱ्यात सापडली असून चौकशी करावी, अशी लक्षवेधी पारनेरचे आमदार काशिनाथ दातें यांनी विधानसभेत मांडली आहे.
या खरेदीत स्टील युनिव्हर्सल आर्टिफिशियल इन्समिनेशन गन, थाऊ मॉनिटर, थर्मास फ्लास्क, डिप स्टीक हे साहित्यही निविदा प्रक्रिया न राबवता बाजारभावापेक्षा अधिकच्या दराने खरेदी करत कोट्यवधी रूपयांचे नुकसान केले असल्याचे मुख्यमंत्र्यांसह पशुसंवर्धन मंत्री आणि विभागाच्या सचिवांच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे.
गुरुवार दि. ३ जुलै २०२५ राज्यातील पशुधन विकास मंडळातील साहित्य खरेदीत झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहारावर पारनेर-नगर मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते यांनी विधानभवनात ठाम भूमिका मांडत पशुधन विकास मंडळातील मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सतिश राजू यांनी जनावर साहित्य खरेदीमध्ये नियम धाब्यावर बसवून मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता केली असल्याचे निदर्शनास आल्याचे म्हटले आहे.
डॉ सतीश राजु तातडीने कार्यमुक्त
यासंदर्भात पशुधन मंत्री पंकजा मुंडें उत्तर देताना पशुधन विकास मंडळ नागपूर या संस्थेने साहित्य खरेदी करताना अनियमितता केली असल्याने डॉ. सतीश राजू यांच्याकडील मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार काढून घेण्यात आला असुन डॉ. सतीश राजू यांच्याविरुद्ध शिस्तभंगाविषयी कारवाई करण्यात येत असल्याचेही मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.
पशुधन विकास मंडळाच्या अधिकाऱ्यांनी साहित्य खरेदी करताना योग्य निविदा प्रक्रिया राबवली नसल्याने, राज्य शासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करावी व यापुढील काळात अशा प्रकारचे गैरव्यवहार होऊ नये यासाठी योग्य ती काळजी घ्यावी. -आ. काशिनाथ दाते