Join us
Daily Top 2Weekly Top 5

International Women's Day : महाराष्ट्रातील 'या' महिलेनं चालवलं पंतप्रधान मोदींचं ट्विटर अकाऊंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2020 18:21 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक महिला दिनाचे औचित्त साधून आपले सोशल मीडिया अकाऊंटस् अशा महिलांकडे सोपवून दिले की

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज आपला ट्विटर अकाउंट महिलांना चालविण्यासाठी दिलं होता. त्यामध्ये महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील बंजारा समाजातील महिलेला मोदींनी आपलं ट्विटर अकाऊंट चालवायला दिलं होतं. विजया पवार असे या महिलेचं नाव असून विजया या महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील बंजारा समाजाचे प्रतिनिधीत्व करतात. गेल्या दोन दशकांपासून त्या गोरमाटी कलेच्या क्षेत्रात काम करीत आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक महिला दिनाचे औचित्त साधून आपले सोशल मीडिया अकाऊंटस् अशा महिलांकडे सोपवून दिले की, ज्या महिलांची यशोगाथा जगासाठी प्रेरणा स्त्रोत आहे. त्यानुसार, आज नरेंद्र मोदींचे ट्विटर अकाऊंट देशातील सुप्रसिद्ध महिलांनी हाताळले. महाराष्ट्राच्या बंजारा समाजातील महिलांना मोदींच्या ट्विटर हँडलवर संधी मिळाली. हस्तकलेचा आणि या कलेचा लघु-उद्योग उभारणाऱ्या महिलांना मोदींनी आपलं ट्विटर अकाऊंट दिलं होतं. गोरमाटी कलेला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक मदतही केल्याचे विजया यांनी सांगितले. मी लहानपनापासूनच हस्तकला शिकत आले आहे, अगदी घरातूनच आम्हाला तो वारसा मिळालाय. लग्नानंतरही मी हस्तकलेचं काम सुरूच ठेवलं, माझ्या पती आणि सासूने मला खूप पाठिंबा दिला. सन 2004 मध्ये आम्ही स्फुर्ती क्लस्टर नावाने एनजीओची स्थापना केली. घर गाव आणि आता तालुका पातळीवर आम्ही हे काम नेलं आहे. आम्ही प्रत्येक बंजार तांड्यात जाऊन महिलांना यामध्ये सहभागी होण्याचं सूचवलं. 

आंबेडकर हस्तशिल्प योजनेतून आम्हाला कार्यक्रम चालविण्यास मिळाला. त्यामध्ये 642 महिलांचा समावेश आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमातून महिलांना रोजगारनिर्मित्ती कशी करावी हेही शिकवलं. आज आमच्या जवळपास 450 महिला काम करत असून 150 महिला स्वत:चा लहान उद्योग चालवत आहेत, असे विजया यांनी सांगितलं.   

दरम्यान, या कार्याची दखल घेत महिला दिनी पंतप्रधानांनी ट्विटर हँडल चालवण्यासाठी केलेली निवड हा मोठा गौरव असल्याचेही विजया पवार यांनी म्हटले. तसेच, मोदींचे आभारही त्यांनी मानले. 

 

टॅग्स :नरेंद्र मोदीट्विटरमहाराष्ट्रमुंबई