पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2018 04:50 IST2018-08-11T04:49:49+5:302018-08-11T04:50:10+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी मुंबई दौऱ्यावर असून सकाळी भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबईच्या ५६व्या दीक्षान्त समारंभाला ते उपस्थित राहतील.

Prime Minister Narendra Modi in Mumbai today | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी मुंबई दौऱ्यावर असून सकाळी भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबईच्या ५६व्या दीक्षान्त समारंभाला ते उपस्थित राहतील. या दीक्षान्त सोहळ्यात ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. दीक्षान्त समारंभानंतर आयआयटी मुंबई येथे पर्यावरणीय विज्ञान व अभियांत्रिकी केंद्र, ऊर्जा विज्ञान व अभियांत्रिकी विभागाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन करतील. पंतप्रधानांसह दीक्षान्त सोहळ्याला मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील. आयआयटीच्या वतीने सिम्फनी टेक्नोलॉजी ग्रुपचे संस्थापक मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रोमेश टी. वाधवानी यांना डी लिट प्रदान करण्यात येणार आहे.

Web Title: Prime Minister Narendra Modi in Mumbai today