सुराज्य हे देशवासीयांचे कर्तव्य; पंतप्रधान मोदी यांनी घेतले बाप्पाचे दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2019 02:15 AM2019-09-08T02:15:05+5:302019-09-08T02:15:25+5:30

पु. ल. गौरव दालनास भेट । हसताय ना, संघाच्या पदाधिकाऱ्यांना केला मिश्कील प्रश्न

Prime Minister Modi visits Bappa; | सुराज्य हे देशवासीयांचे कर्तव्य; पंतप्रधान मोदी यांनी घेतले बाप्पाचे दर्शन

सुराज्य हे देशवासीयांचे कर्तव्य; पंतप्रधान मोदी यांनी घेतले बाप्पाचे दर्शन

Next

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघाच्या गणेशाचे दर्शन घेत पूजा केली. नंतर ते नागरिकांच्या ‘मोदी... मोदी...’च्या घोषणांना प्रतिसाद देण्यासाठी मोटारीत न बसता चालतच संघाच्या बाहेर आले. त्यांनी हात जोडून, हात उंचावून नागरिकांना प्रतिसाद देताच परिसर ‘भारतमाता की जय’च्या घोषणांनी दणाणून गेला. दरम्यान, संघाच्या सभागृहातील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुतळ्यास मोदी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बाप्पाचे दर्शन घेऊन लोकमान्य टिळक यांना अभिवादन केले.

संघाने उभ्या केलेल्या पु. ल. गौरव दालनास पंतप्रधान मोदी यांनी या वेळी भेट दिली. या ठिकाणी पुलंच्या साहित्यकृती, काही दस्तावेज, लेखन-सामग्री आणि वस्तू, छायाचित्रांचे जतन करण्यात आले आहे. या संग्रहाची पंतप्रधान मोदी यांनी माहिती घेत अभिप्रायही नोंदविला. पु. ल. म्हणजे हसू. मग तुम्ही या दालनात आल्यावर हसता ना? असा मिश्कील प्रश्नही त्यांनी संघाच्या उपस्थित पदाधिकाऱ्यांना केला. या वेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार मंगल प्रभात लोढा, पराग अळवणी उपस्थित होते.

संघाचे अध्यक्ष मुकुंद चितळे, दीपक घैसास, उदय तारदाळकर यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासह मान्यवरांचे स्वागत केले. तसेच सेवा संघ आणि पु. ल. देशपांडे गौरव दालनाची माहिती दिली. देशहिताचा संकल्प करण्याचे आवाहन मुंबई प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने आयोजित तीन नवीन मेट्रो मार्गांचे भूमिपूजन आणि इतर कार्यक्रमांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी ११ वाजता वांद्रे-कुर्ला संकुलातील जी ब्लॉक येथील कॉन्व्हेन्शन सेंटरमध्ये दाखल झाले. या वेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधत त्यांना देशहिताचा संकल्प करण्याचे आवाहन केले.

प्रत्येक भारतीयाने देशहिताचा संकल्प करून त्याची पूर्ती करण्याचे आवाहन करतानाच ‘एक भारतीय एक संकल्प’ या संकल्पनेची पंतप्रधान मोदी यांनी घोषणा केली.

सुराज्य हे देशवासीयांचे कर्तव्य
सुराज्य हे देशवासीयांचे कर्तव्य असल्याचा नवा मंत्र पंतप्रधान मोदी यांनी या वेळी दिला. जलप्रदूषण होणार नाही याची दक्षता घ्या
गणपती बाप्पाच्या विसर्जनादरम्यान जलप्रदूषण होणार नाही याची दक्षता घ्या. बाप्पाच्या विसर्जनावेळी प्लॅस्टिकसह प्रदूषण वाढविणाºया इतर गोष्टी समुद्रात न टाकण्याचा संकल्प मुंबईकरांसह प्रत्येकानेच करावा, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी या वेळी केले.

Web Title: Prime Minister Modi visits Bappa;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.