Join us

Coronavirus: यंदा बाप्पा येणार?; सार्वजनिक गणेशोत्सव समितीने घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 09:11 IST

आगामी गणेशोत्सवावरही अनिश्चिततेचे सावट तयार झाले आहे.

मुंबई: लॉकडाउननंतरही राज्यासह मुंबई शहरांत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे यंत्रणांवरील ताण वाढत असून विषाणूवरील नियंत्रणाचे आव्हान अधिक कठीण होत आहे. राज्यात रविवारी ६७८ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून २७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यत कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या ५४८ वर पोहोचली आहे. त्याचप्रमाणे कोरोनाचे संकट पाहता गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, रमजान यासाराखे सण घरातच साजरे करण्यात आले. तसेच आगामी गणेशोत्सवावरही अनिश्चिततेचे सावट तयार झाले आहे.

मुंबईच्या गणेशोत्सवाची चर्चा जगभर होते हे सर्वश्रुत आहे. मात्र कोरोनामुळे मुंबईतील परिस्थिती सध्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. याआधी देखील गणेशोत्सवच्या काळात अनेक नैसर्गिक आपत्ती आल्या आहेत. मात्र, मुंबईचा गणेशोत्सव नेहमीच थाटामाटात साजरा झालेला पाहायला मिळाला आहे. परंतु यंदा कोरोनामुळे आगामी गणेशोत्सव साजरा होणार की नाही याबाबत चर्चा सुरु झाल्या आहे.

मुंबईतील काही मोठ्या गणेशोत्सव मंडळांनी वेट अँड वॉच'ची भूमिका घेतली असली, तरी अनेक छोट्या मंडळांकडून, काही अतिउत्साही कार्यकर्त्यांकडून मूर्तीबाबत विचारणा केली जात असल्याचे मूर्तिकारांनी सांगितले. तसेच गणेशोत्सव मंडळांनी यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनी केले आहे. तसेच परिस्थितीचा विचार करुन लवकरच योग्य तो निर्णय घेतला जाईल अशी माहिती नरेश दहिबावकर यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.

नरेश दहिबावकर म्हणाले की, मुंबईवर ओढवलेले संकट पाहता यंदाचा गणेशोत्सव अगदी साधेपणाने साजरा करण्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत. गणेशोत्सव हा गर्दीचा सण असून, गर्दीमुळे करोनाचा संसर्ग लक्षात घेत भाविकांसह, कार्यकर्त्यांचे जीव धोक्यात घालणे योग्य नाही, असं नरेश दहिबावकर यांनी सांगितले. तसेच याआधीदेखील मुंबईतील गणेशोत्सवाने अनेक कठीण प्रसंगांमध्ये सामाजिक भान जपले आहे.

गेल्यावर्षी तर पावसामुळे अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली होती. यावेळे अनेक गणेशोत्सव मंडळांनी प्रशासनाला खांद्याला खांदा लावून काम केले. मात्र गेल्या काही दिवसांपासून पालिका, पोलिस यंत्रणेवर अधिक ताण आहे. त्यामुळे कोरोनामुळे शहरातील परिस्थिती आणखीच बिघडली तर मोठ्या मंडळांनी छोट्या मुर्ती, गणेश मुर्तीचा फोटो पूजण्याची मानसिक तयारी देखील ठेवा असं नरेश दहिबावकर यांनी सांगितले. त्याचप्रमाणे सार्वजिनक गणेशोस्तव घरातही कसा साजरा केला जाऊ शकतो, याबाबत आम्ही विचार करत असल्याची माहिती नरेश दहिबावकर यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली. 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

IFSC: खायचे महाराष्ट्राचे व गोडवे गायचे महाराष्ट्रावर अन्याय करणाऱ्यांचे; शिवसेनेकडून फडणवीसांचा समाचार

Coronavirus: कोरोना लसीच्या आम्ही एकदम जवळ; डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितली 'वेळ'

होय, ते परत येताहेत; पण तिरंग्यात लपेटून; शहीद कर्नल शर्मा यांच्या पत्नीची आर्त भावना

... तर लॉकडाऊनचे नियम मोडून आम्ही रस्त्यावर उतर, खासदार जलील यांचा इशारा

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्यागणेशोत्सवमुंबईमहाराष्ट्रमहाराष्ट्र सरकार