Deglur Bypoll: “...म्हणून देगलूरमध्ये भाजपचा पराभव झाला”; प्रवीण दरेकरांनी सांगितलं नेमकं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 11:10 PM2021-11-03T23:10:02+5:302021-11-03T23:10:59+5:30

Deglur Bypoll: महाविकास आघाडीचा फॉर्म्यूला जमला म्हणतात. मग तो फॉर्म्यूला पंढरपुरात का जमला नाही, अशी विचारणाही दरेकर यांनी केली. 

pravin darekar explained why bjp losses in deglur biloli bypoll election | Deglur Bypoll: “...म्हणून देगलूरमध्ये भाजपचा पराभव झाला”; प्रवीण दरेकरांनी सांगितलं नेमकं कारण

Deglur Bypoll: “...म्हणून देगलूरमध्ये भाजपचा पराभव झाला”; प्रवीण दरेकरांनी सांगितलं नेमकं कारण

Next

मुंबई:देगलूर-बिलोली विधानसभेच्या पोटनिवडणुकीत (Deglur Bypoll) कॉंग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकरा यांनी दणदणीत विजय मिळवला. भाजपच्या सुभाष साबणे यांचा जितेश अंतापूरकर यांनी तब्बल ४१ हजार ९३३ मतांच्या फरकाने पराभव केला. यानंतर काँग्रेससह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आनंद व्यक्त करत भाजपवर टीका केली. या पार्श्वभूमीवर भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी देगलूर पोटनिवडणुकीत भाजपच्या पराभवाबाबत भाष्य केले आहे. मुस्लीम समाजाने भाजपच्या द्वेषापोटी मते केली, असा दावा दरेकर यांनी केला आहे. 

प्रवीण दरेकर यांनी भाजपची रणनीती नेमकी कुठे चुकली आणि जनतेची भाजपविषयीची आपली मते बदलली आहेत का, तसेच भाजपचा पोटनिवडणुकीत पराभव का झाला असावा, यावर आपली मते मांडली. तसेच या पराभवामागची कारणेही सांगितली आहेत. महाविकास आघाडीचा फॉर्म्यूला जमला म्हणतात. मग तो फॉर्म्यूला पंढरपुरात का जमला नाही, अशी विचारणाही दरेकर यांनी यावेळी बोलताना केली. 

देगलूरलाही ताकदीनेच लढलो

पंढरपुरात ताकदीने लढलो त्याचप्रमाणे देगलूरलाही लढलो. निवडणुकीत विजय-पराभव होत असतो. त्याला अनेक कारणे असतात. गेल्यावेळी शिवसेना-भाजपला मते पडली होती त्याच्यापेक्षा जास्त मते यावेळी भाजपच्या उमेदवाराला पडली आहेत. निवडणुकीत मुस्लीम समाजाने भाजपच्या द्वेषापोटी मतदान केले. तसेच वंचित बुहजन आघाडी २५ हजाराचे मत देईल, असा मला वाटले होते. पण पराभव हा पराभव असतो. तो आम्ही खुल्या मनाने स्वीकारला आहे, असे दरेकर यांनी सांगितले.

कुठे चूक झाली यावर अभ्यास करणार

देगलूर पोटनिवडणुकीत पराभव झाल्यानंतर भाजप उमेदवार सुभाष साबणे यांनी आम्हाला निकाल मान्य आहे. जनतेने दिलेला कौल आम्ही विनम्रपणे स्वीकारतो. तसेच काय चुका झाल्या यावर विचार करुन पुढच्या निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागू, अशी प्रतिक्रिया दिली होती. 

दरम्यान, पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपने विजय मिळविल्यानंतर महाविकास आघाडीसमोर देगलूर-बिलोली पोटनिवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. या पोटनिवडणुकीत सुभाष साबणे यांनी भाजप, तर दिवंगत रावसाहेब अंतापूरकर यांचा मुलगा जितेश यांनी महाविकास आघाडीतर्फे निवडणूक लढवली. जितेश यांनी साबणे यांच्यावर तब्बल ४१ हजार ९३३ मतांनी विजय मिळवला. पिता आणि पुत्राने लागोपाठ दोन निवडणुकीत एकाच उमेदवाराचा पराभव केल्याचे पाहायला मिळाले. 
 

Web Title: pravin darekar explained why bjp losses in deglur biloli bypoll election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.