पवई आयआयटीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 06:25 IST2023-02-13T06:24:48+5:302023-02-13T06:25:14+5:30

होस्टेलच्या ७ व्या मजल्यावरून घेतली उडी

Powai IIT student commits suicide | पवई आयआयटीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

पवई आयआयटीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पवईच्या आयआयटी येथे केमिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याने वसतिगृह इमारतीच्या ७ व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. दर्शन सोलंकी (१८) असे त्याचे नाव असून, याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करत तपास सुरू केला आहे.

सोलंकी हा मूळचा अहमदाबादचा राहणारा असून, पवईच्या आयआयटीमध्ये तो तीन महिन्यांपूर्वी आला होता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास वसतिगृहाच्या खिडकीत असलेल्या आणखी एका विद्यार्थ्याने त्याला सातव्या मजल्यावरील रिफ्युज एरियाच्या काठावर जाताना पाहिले. पवई पोलिस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, दर्शन इतरांशी फारच कमी बोलायचा. त्याच्या रूम पार्टनरसोबतही त्याचा फार संवाद नव्हता. प्रथमदर्शनी असे दिसते की, त्याने एकटेपणाला कंटाळून हे पाऊल उचलले असावे. नुकताच आयआयटी मुंबईतील पहिल्या सत्रामधील शेवटच्या परीक्षेचा समारोप झाला. पोलिसांचा असाही अंदाज आहे, की शैक्षणिक दबावामुळे त्याचा ताण वाढला असावा.

Web Title: Powai IIT student commits suicide