वादातून राजकीय पदाधिकाऱ्याची भर रस्त्यात हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 12:44 IST2023-08-02T12:43:43+5:302023-08-02T12:44:27+5:30

याप्रकरणी पवई पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संदीप बिऱ्हाडे याला अटक केली आहे.

Political office bearer killed on the road due to dispute | वादातून राजकीय पदाधिकाऱ्याची भर रस्त्यात हत्या

वादातून राजकीय पदाधिकाऱ्याची भर रस्त्यात हत्या

मुंबई : पवई येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. वादातून एका राजकीय पदाधिकाऱ्याची भर रस्त्यात करण्यात आली आहे. सोमवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी पवई पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संदीप बिऱ्हाडे याला अटक केली आहे.

आरपीआय आठवले गटाचा पदाधिकारी किरण गायकवाड आणि कार्यकर्ता संदीप बिऱ्हाडे यांच्यात वैयक्तिक कारणातून वाद झाला. या वादातून संदीप याने गायकवाड याची चाकू भोसकून रस्त्यात हत्या केली. हत्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी संदीप याला ताब्यात घेतले. सूत्रांच्या म्हणण्यानुसार प्रेम प्रकरणातून हा प्रकार घडला असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान पोलिस याप्रकरणी तपास करत आहेत.
 

Web Title: Political office bearer killed on the road due to dispute