Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई : अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलीस निरीक्षकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2018 11:55 IST

अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न राणे (वय 46 वर्ष) यांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई - अज्ञात वाहनाच्या धडकेत मुंबई पोलीस सेवेत कार्यरत असणा-या एका पोलीस कर्मचा-याचा मृत्यू झाला आहे. शत्रुघ्न राणे (वय 46 वर्ष) असे त्यांचे नाव असून ते सहाय्यक पोलीस निरीक्षक होते. शत्रुघ्न राणे यांच्या मोटर सायकलला अज्ञात वाहनानं दिलेल्या भीषण धडकेत त्यांचा मृत्यू झाला आहे. रविवारी (4 मार्च) मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास  बोरिवली मागाठाणे परिसरात हा अपघात झाला आहे. 

शत्रुघ्न राणे विशेष शाखा 2 मध्ये कार्यरत होते व  कांदिवली येथे वास्तव्यास होते. याप्रकरणी कस्तुरबा पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे, अशी माहिती कस्तुरबा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश रावराणे यांनी 'लोकमत' शी बोलताना सांगितले.

टॅग्स :मुंबईपोलिसअपघात