मुंबईत पोलीस हवालदाराच्या मुलाची आत्महत्या, वडिलांच्या सर्व्हिस रिवॉल्व्हरमधून स्वत:वर झाडल्या गोळ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 17:10 IST2025-01-24T17:09:29+5:302025-01-24T17:10:01+5:30

मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई पोलिसातील एका हवालदाराच्या मुलाने वडिलांच्या सर्व्हिस रिवॉल्व्हरमधून स्वत:वर गोळ्या झाडून घेतल्या आहेत.

Police constable's son commits suicide in Mumbai, shoots himself with father's service revolver | मुंबईत पोलीस हवालदाराच्या मुलाची आत्महत्या, वडिलांच्या सर्व्हिस रिवॉल्व्हरमधून स्वत:वर झाडल्या गोळ्या

मुंबईत पोलीस हवालदाराच्या मुलाची आत्महत्या, वडिलांच्या सर्व्हिस रिवॉल्व्हरमधून स्वत:वर झाडल्या गोळ्या

मुंबईपोलिसातील एका हवालदाराच्या मुलाने वडिलांच्या सर्व्हिस रिवॉल्व्हरमधून स्वत: गोळ्या झाडून घेतल्या आहेत. या घटनेत या मुलाचा मृत्यू झाला. हर्ष मस्के असं या मुलाचे नाव आहे. तो २० वर्षाचा होता.  घरातील बाथरुममध्ये त्याने स्वत:वर गोळ्या झाडून घेतल्या. 

मिळालेली माहिती अशी, मुंबईतील लोअर परेल परिसरातील एन.एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंबई पोलिसातील हवालदाराच्या मुलाने आत्महत्या केली. हर्ष मस्के असं या मुलाचे नाव आहे.  सेंचुरी म्हाडा कॉलनी, येथे ते राहत आहेत.

हातात बाळ अन् फोनवर लक्ष... मॅनहोलमध्ये पडली महिला; अंगावर काटा आणणारा Video

एसपीयू मध्ये नेमणुकीस असलेले पोलीस अंमलदार संतोष मस्के यांचा मुलगा हर्ष हा मुलगा आहे. तो २० वर्षाचा होता. त्याने राहत्या घराच्या बाथरूम मध्ये वडिलांच्या  सर्व्हिस रिवॉल्व्हरमधून डोक्यात गोळी मारून आत्महत्या केली आहे. 

या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे. 

Web Title: Police constable's son commits suicide in Mumbai, shoots himself with father's service revolver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.