शुभम् भवतु! अनंत-राधिका या नवदाम्पत्याला PM मोदींनी दिले 'शुभ आशीर्वाद'! पाहा Video
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2024 21:34 IST2024-07-13T21:34:08+5:302024-07-13T21:34:30+5:30
PM Modi at Anant Ambani Radhika Merchant Wedding Reception: मुकेश आणि नीता अंबानी यांनी पंतप्रधान मोदी यांचे केले विशेष स्वागत

शुभम् भवतु! अनंत-राधिका या नवदाम्पत्याला PM मोदींनी दिले 'शुभ आशीर्वाद'! पाहा Video
PM Modi at Anant Ambani Radhika Merchant Wedding Reception: अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि उद्योगपती वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट यांचा शुक्रवारी मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये शाही विवाहसोहळा पार पडला. या आलिशान लग्नाला देशासह जगभरातील प्रसिद्ध व्यक्तींनी हजेरी लावली. क्रीडा, व्यवसाय, मनोरंजन आणि राजकारणातील जगातील लोकप्रिय चेहऱ्यांची या सोहळ्याला उपस्थिती दिसली. अनंत आणि राधिकाच्या लग्नाचे कार्यक्रम १२ ते १५ जुलै असे तीन दिवस सुरु आहेत. त्यात आज शनिवारी या नवदाम्पत्याचा 'शुभ आशीर्वाद' सोहळा आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही उपस्थिती लावली. रात्री सुमारे ८ वाजून ४५ मिनिटांनी पंतप्रधान मोदी या सोहळ्याला आले आणि नवदाम्पत्याला आशीर्वाद दिले.
— Viru B (@ViruB1023220) July 13, 2024
अनंत-राधिका या नवदाम्पत्याला आशीर्वाद देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बीकेसीच्या जिओ वर्ल्डमध्ये दाखल झाले. संपूर्ण अंबानी कुटुंब पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी हजर होते. वरमाय नीता अंबानी आणि वरपिता मुकेश अंबानी यांनी स्वतः त्यांचे स्वागत केले. पीएम मोदींनी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांची भेट घेऊन त्यांना आशीर्वाद दिले.
दरम्यान, राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांचे लग्न १२ जुलैला पार पडले. आज, १३ जुलैला 'शुभ आशीर्वाद' सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. 'मंगल उत्सव' किंवा लग्नाचे रिसेप्शन हे १४ जुलै रोजी आयोजित केले आहे. तर, १५ जुलै रोजी मुंबईत दुसरी रिसेप्शन पार्टी आयोजित केली जाणार आहे.