रुग्णांच्या जिवाशी खेळ, अडीच कोटींची निकृष्ट औषधे जप्त; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 09:43 AM2023-12-28T09:43:17+5:302023-12-28T09:44:17+5:30

नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने विविध उपक्रम राबविले आहेत.

Playing with the lives of patients seizure of substandard drugs worth two and a half crores; Action by the Food administration in mumbai | रुग्णांच्या जिवाशी खेळ, अडीच कोटींची निकृष्ट औषधे जप्त; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई 

रुग्णांच्या जिवाशी खेळ, अडीच कोटींची निकृष्ट औषधे जप्त; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई 

मुंबई : नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने विविध उपक्रम राबविले आहेत. या उपक्रमाचा एक भाग म्हणून गेल्या ८ महिन्यांत तब्बल अडीच कोटींची निकृष्ट दर्जाची औषध जप्त केली आहेत. या एकूण कारवायांमध्ये २८ गुन्हे दाखल असून, ३३ व्यक्तींना अटक केली आहे.  औषध खरेदी करताना सजगता बाळगली पाहिजे, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.

औषध विक्री करण्याच्या प्रक्रियेत परवाना महत्त्वाचा असतो. त्यामुळे उत्पादन निर्मिती, साठवणूक आणि विक्री याबाबतचे कठोर नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.  अशाच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेते, उत्पादकांवर कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. 

विशेष माेहीम हाती:

 अन्न व औषध प्रशासनाच्या विभागाने विशेष माेहीम हाती घेतली. याअंतर्गत एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत ५३ ठिकाणी कारवाया करण्यात आल्या. 

 या कारवायांदरम्यान २ कोटी ५४ लाख ८५ हजारांचा औषधांचा साठा जप्त केला आहे.  

 यात निकृष्ट दर्जाची, बनावट, परवान्याशिवाय विकलेल्या कमी दर्जाच्या औषधांचा समावेश आहे.विशेष माेहीम हाती 
 अन्न व औषध प्रशासनाच्या विभागाने विशेष माेहीम हाती घेतली. याअंतर्गत एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत ५३ ठिकाणी कारवाया करण्यात आल्या. 

 या कारवायांदरम्यान २ कोटी ५४ लाख ८५ हजारांचा औषधांचा साठा जप्त केला आहे.  

 यात निकृष्ट दर्जाची, बनावट, परवान्याशिवाय विकलेल्या कमी दर्जाच्या औषधांचा समावेश आहे.

Web Title: Playing with the lives of patients seizure of substandard drugs worth two and a half crores; Action by the Food administration in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.