'जनतेने मुंबई महानगरपालिका मधील २५ वर्षांचा कारभार स्पष्टपणे नाकारला'; एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 01:01 IST2026-01-17T00:55:09+5:302026-01-17T01:01:37+5:30

मुंबई महानगरपालिकेचे निकाल समोर आले असून भाजपाने मोठा विजय मिळवला आहे.

'People clearly rejected 25 years of governance in Mumbai Municipal Corporation'; Eknath Shinde targets Thackeray | 'जनतेने मुंबई महानगरपालिका मधील २५ वर्षांचा कारभार स्पष्टपणे नाकारला'; एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा

'जनतेने मुंबई महानगरपालिका मधील २५ वर्षांचा कारभार स्पष्टपणे नाकारला'; एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा

राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचे निकाल समोर आले. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपाला मोठं यश आले, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने जोरदार लढत दिली. या निवडणुकीत भाजपाने ८९, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ६५, शिवसेना २४, काँग्रेस २४, AIMIM-8, मनसे ६ असे निकाल समोर आले आहे. दरम्यान आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निकालावर प्रतिक्रिया दिली.  शिंदे यांनी मतदारांचे आभार मानले. मुंबई, ठाणे तसेच राज्यातील इतर महानगरपालिकांमधील जनतेने पुन्हा एकदा आमच्यावर विश्वास दाखवला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

एकनाथ शिंदे म्हणाले की, काही लोकांनी भावनांच्या आधारावर निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला. मात्र मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात आपण आणि देवेंद्र फडणवीस यांनी जी रखडलेली किंवा थांबलेली कामे होती, ती पूर्ण केली. याच कामांचा कौल जनतेने दिला असल्याचं त्यांनी सांगितलं.

शिंदे यांनी पुढे म्हटलं की, जनतेने मुंबई महानगरपालिका मधील २५ वर्षांचा कारभार स्पष्टपणे नाकारला आहे. मुंबईकरांनी विकासाला स्वीकारले असून विकासाला विरोध करणाऱ्यांना नाकारले आहे, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या निकालामुळे राज्याच्या राजकारणात विकास विरुद्ध भावनांचे राजकारण हा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला असून, महायुतीच्या कामगिरीला मिळालेल्या जनादेशाचं श्रेय विकासकामांनाच असल्याचं शिंदे यांनी अधोरेखित केलं. 

Web Title : जनता ने बीएमसी के 25 साल के शासन को नकारा: शिंदे का ठाकरे पर निशाना

Web Summary : एकनाथ शिंदे का दावा है कि मतदाताओं ने बीएमसी के 25 साल के शासन को खारिज कर दिया। शिंदे ने सरकार के विकास कार्यों पर भरोसा जताने के लिए मतदाताओं को धन्यवाद दिया। उन्होंने जोर दिया कि लोगों ने राजनीति में भावनात्मक अपील के बजाय विकास को तरजीह दी।

Web Title : Public Rejected 25 Years of BMC Rule: Shinde Targets Thackeray

Web Summary : Eknath Shinde claims voters rejected the 25-year rule of the BMC. Shinde thanked voters for trusting the government's development work. He emphasized that people favored development over emotional appeals in politics.