‘म्हाडा’चे प्रकल्प वेळेत पूर्ण न केल्यास बिल्डरांना दंड लावा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2024 07:51 AM2024-02-25T07:51:15+5:302024-02-25T07:51:25+5:30

कोकण म्हाडाच्या ५ हजार ३११ घरांची लॉटरी शनिवारी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे झालेल्या समारंभात काढण्यात आली.

Penalize builders if 'MHADA' projects are not completed on time; Chief Minister Eknath Shinde's suggestion | ‘म्हाडा’चे प्रकल्प वेळेत पूर्ण न केल्यास बिल्डरांना दंड लावा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सूचना

‘म्हाडा’चे प्रकल्प वेळेत पूर्ण न केल्यास बिल्डरांना दंड लावा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ‘म्हाडा’ने वेळेत गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करून घ्यायला हवेत, अन्यथा प्रकल्प रेंगाळून पुन्हा त्यांची दुरुस्ती करण्याची वेळ येते. जे बिल्डर वेळेत प्रकल्प पूर्ण करतील, त्यांना बक्षीस द्यावे आणि जे मर्यादित वेळेत पूर्ण करणार नाहीत त्यांना दंड लावा, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी ठाण्यातील कोकण म्हाडाच्या लॉटरी समारंभात दिला.

कोकण म्हाडाच्या ५ हजार ३११ घरांची लॉटरी शनिवारी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे झालेल्या समारंभात काढण्यात आली.  विजेत्यांना शुभेच्छा देताना मुख्यमंत्री शिंदे यांनी गृहप्रकल्पांना होणाऱ्या विलंबाबाबत  चिंता व्यक्त केली. गुणवत्तापूर्ण घरे तयार करताना ती वेळेत पूर्ण करण्याची गरज व्यक्त केली. शेवटच्या घटकापर्यंत फायदा पोहोचण्यासाठी नियम सुटसुटीत करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करणाऱ्या ३० हजार लोकांना घरे देण्यासाठी प्रयत्न करायचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

गिरणी कामगारांनाही घरे देण्यास सुरुवात
म्हाडाच्या माध्यमातून आतापर्यंत नऊ लाख घरे दिल्याचे सांगून शिंदे म्हणाले की, ही संख्या मोठी आहे. तसेच गिरणी कामगारांनाही घरे देण्यास सुरुवात केली आहे. मुंबईप्रमाणे ठाण्यातही गिरण्या होत्या. 
ज्यांना या लॉटरीमध्ये घरे मिळणार आहेत, त्यांचे अभिनंदन, ज्यांना मिळणार नाहीत, त्यांचेसुद्धा अभिनंदन. त्यांना दुसऱ्या लॉटरीत घरे मिळतील आणि त्यांचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होईल.

Web Title: Penalize builders if 'MHADA' projects are not completed on time; Chief Minister Eknath Shinde's suggestion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.