अतिवृष्टी, पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ; राज्य सरकारची घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 08:59 PM2020-02-12T20:59:01+5:302020-02-12T21:00:21+5:30

मागील वर्षी पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पुराने लोकांचे जनजीवन विस्कळीत झालं होतं.

Peasants' loan waiver due to heavy rain, flood damage; State Government Announcement | अतिवृष्टी, पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ; राज्य सरकारची घोषणा 

अतिवृष्टी, पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ; राज्य सरकारची घोषणा 

Next

मुंबई - राज्यात जुलै ते ऑगस्ट २०१९ दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून मदत जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. यामध्ये अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत राज्य सरकारने आज जीआर काढला आहे.

मागील वर्षी पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पुराने लोकांचे जनजीवन विस्कळीत झालं होतं. कोल्हापूर, सातारा, सांगली याठिकाणी हजारो लोकांना सुरक्षितस्थळी हलविलं होतं. राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे १३ जिल्ह्यातील तब्बल २ लाख १ हजार ४९६ हेक्टरवर क्षेत्रावरील पिके बाधित झाली असून, कोल्हापूर आणि सांगलीला सर्वाधिक फटका बसला होता. सव्वा लाख शेतकऱ्यांनी ३ लाख ७७ हजार ११९ हेक्टर पेरण्या केल्या होत्या; त्यापैकी ६५ हजार २६७ हेक्टर शेतीचे कंबरडे पावसाने मोडले होते. 

Image result for सांगली सातारा पूरफटका

Web Title: Peasants' loan waiver due to heavy rain, flood damage; State Government Announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.