मुंबईतील विद्याविहार परिसरात दुमजली इमारतीचा भाग खचला; दोन जण अडकून, NDRF दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2023 13:36 IST2023-06-25T13:35:01+5:302023-06-25T13:36:46+5:30
मुंबईमधील विद्याविहार येथील राजावाडी कॉलनी येथे दुमजली इमारतीचा भाग खचला आहे.

मुंबईतील विद्याविहार परिसरात दुमजली इमारतीचा भाग खचला; दोन जण अडकून, NDRF दाखल
मुंबई: कालपासून मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पहिल्याच पावसात मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचले होते. त्यामुळे नागरिकांचे खूप हाल झाले. पहिल्याच पावसात अशी अवस्था झाल्यानं पुढे काय होणार?, असा सवाल मुंबईकर उपस्थित करत आहे. याचदरम्यान एक भीषण घटना समोर आली आहे.
मुंबईमधील विद्याविहार येथील राजावाडी कॉलनी येथे दुमजली इमारतीचा भाग खचला आहे. या ठिकाणी दोन जण अडकून पडले आहेत. घटनास्थळी अग्निशमन दल आणि एनडीआरएफ दाखल झाले असून बचावकार्य सुरु आहे. या दुर्घटनेत एकूण चार जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी जखमींना नजिकच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केले आहे.
मुंबई- विद्याविहार येथील राजावाडी कॉलनी येथे दुमजली इमारतीचा भाग खचला आहे. या ठिकाणी दोन जण अडकून पडले आहेत. घटनास्थळी अग्निशमन दल आणि एनडीआरएफ दाखल झाले आहेत. pic.twitter.com/SqPqe6b9qn
— Lokmat (@lokmat) June 25, 2023