Join us

थर्टी फस्टपर्यंत मध्य रेल्वेवर पार्सल विशेष गाड्या सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2020 18:46 IST

मध्य रेल्वे  मार्गावरील सीएसएमटी ते शालिमार व सीएसएमटी -चेन्नई सेंट्रल पार्सल विशेष गाड्या ३१ डिसेंबरपर्यंत चालविण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

 

मुंबई : मध्य रेल्वे  मार्गावरील सीएसएमटी ते शालिमार व सीएसएमटी -चेन्नई सेंट्रल पार्सल विशेष गाड्या ३१ डिसेंबरपर्यंत चालविण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. पार्सल विशेष गाडीतून औषधे आणि नाशवंत सामग्रीची वाहतूक केली जात आहे. 

 सीएसएमटी येथून ३१ डिसेंबरपर्यंत दररोज रात्री ११.५५ वाजता ००११३ पार्सल विशेष गाडी सुटेल. ही गाडी तिसर्‍या दिवशी सकाळी ११.३५ वाजता शालीमार येथे पोहोचेल. ००११४ पार्सल विशेष गाडी ३१ डिसेंबरपर्यंत दररोज रात्री ९.४५ वाजता शालीमार येथून  सुटेल आणि तिसर्‍या दिवशी सीएसएमटी येथे सकाळी ९.२५ वाजता पोहोचेल. या गाडीला  कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, बडनेरा, अकोला, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, झारसुगुडा, राउरकेला, चक्रधरपूर, टाटानगर, खडगपूर, पॉशकुडा, मेचेदा येथे थांबे देण्यात आले आहेत. 

सीएसएमटी येथून ३१ डिसेंबरपर्यंत दर सोमवारी आणि शुक्रवारी रात्री ७.३५ वाजता ००११३ पार्सल विशेष गाडी सुटेल. ही गाडी दुसर्‍या दिवशी रात्री ११.२५ वाजता चेन्नई सेंट्रल येथे पोहोचेल. ००११६ पार्सल विशेष गाडी चेन्नई सेंट्रल येथून ३१  डिसेंबर पर्यंत दर बुधवार आणि रविवारी दुपारी १२.३० वाजता सुटेल. सीएसएमटी येथे  दुसर्‍या दिवशी दुपारी ४.२० वाजता पोहोचेल. या गाडीला कल्याण, लोणावळा, पुणे, सोलापूर, वाडी, सिकंदराबाद, विजयवाडा आणि गुडूर येथे थांबे देण्यात आले आहेत.

टॅग्स :लॉकडाऊन अनलॉकरेल्वेमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस