मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग Param bir Singh यांच्या लेटरबॉम्बनंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांवरAnil Deshmukh १०० कोटींच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचे आरोप झाल्यानंतर विरोधकांनी देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन अनिल देशमुख यांची पाठराखण केली आणि राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं म्हटलं. त्यानंतर आज देवेंद्र फडणवीस यांनीही पत्रकार परिषद घेतली. (Param Bir Singh Letter Bomb Devendra Fadnavis Apologized And Started The Press Conference In Hindi)
"फोन टॅपिंगचे पुरावे घेऊन मी केंद्रीय गृहसचिवांना भेटतोय", देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना होणार
फडणवीसांनी यावेळी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच शरद पवारSharad Pawar यांना टोला लगावला. फडणवीसांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत नियमित प्रथा मोडली आणि त्यांनी याबाबत उपस्थितांची माफी मागितली.
नेमकं काय म्हणाले फडणवीस?"नमस्कार, मी पहिल्यांदा तुमची क्षमा मागतो की आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणं आपण पहिल्यांदा मराठीत प्रेस घेतो. त्यानंतर हिंदीत करतो. पण शरद पवारांनीच हा विषय राष्ट्रीय केला असल्यानं आज आपला प्रकार बदलून तमाम मराठी पत्रकारांची आणि माय मराठीची क्षमा मागून आजची पत्रकार परिषद हिंदीत सुरू करणार आहे", असं फडणवीस म्हणाले.
फडणवीसांच्या या स्पष्टीकरणानंतर पत्रकारानं इंग्रजी असा उल्लेख केल्यानंतर "त्यांच्याइतकं माझं इंग्रजी चांगलं नाही", असं म्हणत फडणवीसांनी अप्रत्यक्षरित्या पवारांना खोचक टोला लगावला.
पाहा व्हिडिओ...
पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटबाबत गौप्यस्फोटपोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटबाबत सबळ पुरावे आणि सविस्तर अहवाल मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे गुप्तचर विभागानं सादर करुनही अद्याप त्यावर कारवाई का झाली नाही?, असा सवाल यावेळी फडणवीस यांनी उपस्थित केला. या अहवालातील संपूर्ण माहिती आपल्याकडे असून फोनटॅपिंगपासून इतर सर्व महत्वाचे पुरावे केंद्रीय गृहसचिवांना देणार असल्याची माहिती यावेळी फडणवीसांनी दिली. फडणवीस आज त्यासाठी दिल्लीला रवाना होणार आहेत.अनिल देशमुख क्वारंटाइन नव्हतेचअनिल देशमुख कोरोनावर मात केल्यानंतर १५ फेब्रुवारीनंतर क्वारंटाइन होते असा दावा शरद पवारांनी केला. पण १५ फेब्रुवारी रोजी देशमुख नागपुरातून मुंबईला विमानानं आल्याचा पुरावा फडणवीसांनी यावेळी सादर केला. त्यामुळे ते क्वारंटाइन नव्हते त्यांनी अनेकांच्या भेटीही घेतल्या असतील ्असा दावा फडणवीस यांनी यावेळी केला.