पान १....अखेर ३६ वर्षांनी मिळाला न्याय

By Admin | Updated: November 21, 2014 22:38 IST2014-11-21T22:38:24+5:302014-11-21T22:38:24+5:30

(सर्वआवृत्त्यांसाठी....कृपया वकीलांची नावे काढू नये....)

Page 1 .... finally got justice after 36 years | पान १....अखेर ३६ वर्षांनी मिळाला न्याय

पान १....अखेर ३६ वर्षांनी मिळाला न्याय

(स
र्वआवृत्त्यांसाठी....कृपया वकीलांची नावे काढू नये....)
.............................
अखेर ३६ वर्षांनी मिळाला न्याय
बालपणी झालेल्या अपघातापोटी एक कोटींची भरपाई
अमर मोहिते : मुंबई
अवघ्या आठ वर्षांचा असताना अपघाताने शारीरिक व्यंग आलेल्या एका मुलाला तब्बल ३६ वर्षांनी उच्च न्यायालयाकडून एक कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसान भरपाई मिळाली आहे़
न्या़ राजेश केतकर यांनी हा निकाल आहे़ त्यात आता ४४ वर्षांच्या झालेल्या त्या मुलाला ३९ लाख ९२ हजार रूपये नुकसान भरपाई १९८७ पासून ९ टक्के व्याज दराने देण्याचे आदेश न्यायालयाने विमा कंपनीला दिले़ या रक्कमेतून अपघात दावा न्यायाधीकरणाने दिलेली चार लाख रूपयांची रक्कम वजा होणार आहे़ त्यामुळे उर्वरित रक्कमेवर नऊ टक्के व्याज मोजल्यास या नुकसान भरपाईची रक्कम एक कोटी रूपयांपेक्षा अधिक होत असल्याचे ॲड़ तेजपाल इंगळे यांनी सांगितले़
पीडिताचे नाव रूपेश रश्मीकांत शहा असे आहे़ १८ ऑक्टोबर १९७८ रोजी शाळेतून परतताना रूपेशला एका ॲम्बेसिडर गाडीने धडक दिली़ तेव्हा तो आठ वर्षांचा होता़ मानव मंदीर शाळेतून चर्नीरोड येथील घरी जाताना ब्रिज कॅण्डी रूग्णालयाजवळ हा अपघात झाला़ हा अपघात एवढा भीषण होता की रूपेशच्या मंेदूला जबदरस्त आघात झाला़ या अपघाताने तो कोमामध्ये गेला होता़ याच अवस्थेत जवळपास सहा महिन्यांनी त्याला रूग्णालयातून घरी आणण्यात आले़
हळुहळू रूपेशच्या प्रकृतीत सुधारणा झाली़ मात्र दैनंदिन कामासाठी त्याला सहाय्यक आवश्यक झाला़ अखेर या अपघाताची नुकसान भरपाई मिळावी म्हणून रूपेशच्यावतीने मोटार अपघात दावा न्यायाधीकरणात दावा दाखल करण्यात आला़ न्यायाधीकरणाने विमा कंपनीला चार लाख पंधरा हजारांची नुकसान भरपाई रूपेशला देण्याचे आदेश दिले़ ही रक्कम आयुष्यभरासाठी पुरेशी नसल्याने रूपेशने ॲड़ तेजपाल इंगळे यांच्यामार्फत याविरोधात उच्च न्यायालयात अपील दाखल केले़
न्या़ राजेश केतकर यांच्या खंडपीठासमोर या अपिलावर सुनावणी झाली़ त्यात ॲड़ इंगळे यांनी रूपेशला कायमस्वरूपी आलेल्या व्यंगाकडे न्यायालयाचे लक्ष वेधले़ ते म्हणाले, रूपेश अवघा आठ वर्षांचा असताना त्याला अपघात झाला़ यात त्याची काहीच चूक नव्हती़ आता त्याचे वय ४४ वर्षे आहे़ सहाय्यकाशिवाय तो दैनंदिन काम करू शकत नाही़ यामुळे त्याचा विवाहही झाला नाही़
आता त्याच्या वडिलांचे वय ७६ असून आईचे वय ६८ आहे़ हे दोघेही त्याचा सांभाळ करत आहे़ पण त्यांच्यानंतर रूपेशची काळजी घेण्यासाठी खाजगी सहाय्यकाची आवश्यकता लागणार आहे़ तसेच त्याच्या औषधोपचारासाठी देखील पैसे लागणार आहेत़ तेव्हा या सर्व बाजूंचा विचार करून अपघात दावा न्यायाधीकरणाने दिलेल्या नुकसान भरपाईत वाढ करावी, अशी मागणी ॲड़ इंगळे यांनी केली़
त्याची दखल घेत न्या़ केतकर यांनी वरील निकाल दिला़ न्या़ केतकर हे सध्या औरंगाबाद खंडपीठात कार्यरत आहेत़ शुक्रवारी त्यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हा निकाल जाहीर केला़ याप्रकरणात ॲड़ उमेश पवार व ॲड़ आनंद लांडगे यांनी ॲड़ इंगळे यांना सहाय्य केले़

Web Title: Page 1 .... finally got justice after 36 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.