८५ आयआयटीयन्सना १ कोटीहून अधिकचे पॅकेज; १३४० विद्यार्थ्यांना संधी, सरासरी पगार २३ लाख

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 01:54 PM2024-01-05T13:54:45+5:302024-01-05T13:54:59+5:30

१ ते २० डिसेंबरदरम्यान ही प्रक्रिया पार पडली. यात ३८८ देशी-परदेशी कंपन्यांनी हजेरी लावली.

Over 1 crore package to 85 IITians; 1340 student opportunities, average salary 23 lakhs | ८५ आयआयटीयन्सना १ कोटीहून अधिकचे पॅकेज; १३४० विद्यार्थ्यांना संधी, सरासरी पगार २३ लाख

८५ आयआयटीयन्सना १ कोटीहून अधिकचे पॅकेज; १३४० विद्यार्थ्यांना संधी, सरासरी पगार २३ लाख

मुंबई : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या नोकरभरती मेळाव्याच्या पहिल्या टप्प्यात १,३४० आयआयटियन्सना देशी-परदेशी कंपन्यात काम करण्याची संधी मिळाली आहे.८५ जणांना एक कोटीहून अधिकचे पॅकेज मिळाले आहे.

१ ते २० डिसेंबरदरम्यान ही प्रक्रिया पार पडली. यात ३८८ देशी-परदेशी कंपन्यांनी हजेरी लावली. यात प्री-प्लेसमेंट ऑफरचाही (पीपीओ) समावेश आहे. कंपन्यांनी उमेदवारांशी वैयक्तिक आणि ऑनलाईनद्वारे संवाद साधला आहे. एकूण १,३२० विद्यार्थ्यांना विविध कंपन्यानी नोकरीची संधी देऊ केली आहे.

अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, आयटी-सॉफ्टवेअर, वित्त, बँकिंग, फिनटेक, व्यवस्थापन सल्ला, डेटा विज्ञान आणि विश्लेषण, संशोधन आणि विकास आणि डिझाइन या क्षेत्रात जास्त नोकऱ्या दिल्या गेल्या. एकूण ६३ आंतरराष्ट्रीय संधी दिल्या गेल्या.

या कंपन्या सहभागी
राऍक्सेंचर, एअरबस, एअर इंडिया, ऍपल, बजाज, आर्थर डी लिटल, कोहेसिटी, द विंची, डीएचएल, फ्युचर फर्स्ट, जीई आयटीसी, गुगल, होंडा आर अँड डी, आयसीआयसीआय-लोम्बार्ड, आयडियाफोर्ज, आयएमसी ट्रेडिंग, इंटेल, जग्वार लँड रोव्हर, जेपी मॉर्गन चेस, जेएसडब्ल्यू, कोटक सिक्युरिटीज, मार्श मॅक्लेनन, महिंद्रा ग्रुप, मायक्रोन, मायक्रोसॉफ्ट, मॉर्गन स्टॅनले, मर्सिडीज-बेंझ, एल अँड टी, एनके सिक्युरिटीज, ओएलए, पी अँड जी, क्वालकॉम, रिलायन्स ग्रुप, सॅमसंग, स्ट्रँड लाइफ सायन्सेस, टाटा ग्रुप, टेक्सास इन्स्ट्रुमेंट्स, टीएसएमसी, टीव्हीएस ग्रुप आणि वेल्स फार्गो आदी कंपन्यांचा समावेश होता.

Web Title: Over 1 crore package to 85 IITians; 1340 student opportunities, average salary 23 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.