One step towards success, towards the health of tribal women | एक पाऊल यशाकडे, आदिवासी महिलांच्या आरोग्याकडे

एक पाऊल यशाकडे, आदिवासी महिलांच्या आरोग्याकडे

मनोहर कुंभेजकर

मुंबई: गोरेगाव (पूर्व ) आरे मधील खडकपाडा येथील 100 आदिवासी महिलांना मोफत कायमस्वरूपी सॅनिटरी पॅड उपलब्ध झाले असून महिलांच्या आरोग्यासाठी हा हा आनंदाचा  क्षण आहे. पॅडवूमन म्हणून ओळख असलेल्या वर्सोवा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार व ती फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ.भारती लव्हेकर  यांनी त्यांच्या डिजिटल पॅड बँकेतून या महिलांना  लागणारे सॅनिटरी पॅड उपलब्ध करून दिले असून त्यांची मोलाची मदत आपल्या अभिषेक सामाजिक व शैक्षणिक शिक्षण संस्था मिळाली आहे. येत्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी महिलांना आमदार लव्हेकर यांच्या सहकार्याने आपल्या संस्थेमार्फत  सॅनिटरी पॅड आणि इम्युनिटी पावर  गोळ्या  त्यांच्यापर्यंत आपण पोहचवणार आहोत. जेणेकरू आदिवासी महिलांचे आरोग्य निरोगी  आणि सुदृढ राहील असा ठाम विश्वास सुनीता नागरे यांनी व्यक्त केला.

 आमदार डॉ. भारती लव्हेकर यांच्या वर्सोवा म्हाडा सोसायटीच्या कार्यालयात नुकत्याच झालेल्या एका छोटेखानी सभारंभात  त्यांनी खडकपाडा आदिवासी पाड्यातील येथील 4 महिलांना सॅनेटरी पॅडचे वाटप केले.तर येत्या आठवड्यात खडकपाडा येथे येऊन उर्वरीत 100 महिलांना सॅनेटरी पॅडचे वाटप 
त्या करणार आहेत.

यावेळी आमदार लव्हेकर यांनी मंजू  बरफ ,आशा  बरफ,वनिता  सुतार ,सीता सुतार यांना सॅनिटरी पॅडचे वाटप केले.यावेळी  प्रभाग क्रमांक 60 चे नगरसेवक योगीराज दाभाडकर,तसेच अभिषेक सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्ष सुनीता नागरे,तसेच सुनंदा रेडकर,जयश्री रेडकर आदी उपस्थित होते.

यावेळी आदिवासी महिलांना मार्गदर्शन करतांना आमदार डॉ.भारती लव्हेकर म्हणाल्या की,आजही आपल्या देशात वयोगट 13 ते 50 या मासिकपाळीत मोडणाऱ्या 33.5 कोटी स्त्रियांपैकी फक्त 15 टक्के स्त्रिया सॅनिटरी पॅडचा वापर करतात.या 37 वर्षाच्या मासिकपाळीच्या काळात स्त्रियांना 2220 दिवस म्हणजे त्यांच्या आयुष्याची 6 वर्षे मासिक पाळीचा कालावधीत जातो. आजही जगात या संवेदनशील विषयाकडे गांभीर्याने स्त्रिया पाहत नसल्याबद्दल खंत व्यक्त करून मासिक पाळीत स्त्रिया कपडे,गोणपाट,वाळू,झाडाची पाने तर नैरोबीसारख्या देशात कोंबडीचे पीस यांचा सॅनिटरी पॅड म्हणून वापर करतात,तर नैरोबीत मासिक पाळीचा अडसर सुखामध्ये येऊ नये म्हणून पुरुष दुसरे लग्न करतात अशी धक्कादायक आकडेवारी त्यांनी दिली.या गहन विषयात घरातील पुरुष मंडळी,मुलांनी स्त्रीची मानसिकता समजून घेऊन तिला मानसिक आधार द्यावा.सुनीता नागरे यांनी राज्यातील आदिवासी महिलांच्या आरोग्यासाठी जनजागृती करावी.त्यांना आपण मोफत सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देणार असून या संस्थेला संपूर्ण सहकार्य करू असे आश्वासन त्यांनी दिले.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: One step towards success, towards the health of tribal women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.