अंधेरी येथील आगीत एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2020 15:03 IST2020-09-13T15:02:50+5:302020-09-13T15:03:16+5:30
एका खासगी इमारतीमध्ये आग लागली.

अंधेरी येथील आगीत एकाचा मृत्यू
मुंबई : मुंबईत पाऊस कोसळत असतानाच आगीच्या घटनांचे सत्र देखील सुरुच असून, रविवारी पहाटे अंधेरी येथे लागलेल्या आगीत मनिष मिश्रा (४५) या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दूर्देवी घटना घडली.
मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाकडून प्राप्त माहितीनुसार, रविवारी पहाटे ५.३५ वाजता अंधेरी पश्चिम येथील अंधेरी क्रिडा संकुल समोरील तळमजला अधिक सहा मजले असलेल्या एका खासगी इमारतीमध्ये आग लागली. इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील खोली क्रमांक १०१, १०२ आणि १०३ मध्ये लागलेली आग पहाटे ६ वाजता विझविण्यात आली. या घटनेत एक व्यक्ती जखमी झाला. त्यास व्यक्तीस कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र या जखमी व्यक्ती सकाळी ७.२० वाजता मृत घोषित करण्यात आले असून, मनिष मिश्रा (४५) असे त्याचे नाव आहे.