one dead and one injured in colaba churchil chamber building fire | कुलाबा येथे लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू
कुलाबा येथे लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू

ठळक मुद्देघटनास्थळी अग्निशमन दलाचे पथक दाखल झाले असून ६ ते ७ जणांना रेस्क्यू करण्यात आलं.या आगीच्या दुर्घटनेत श्याम अय्यर (५४) या पुरुषाचा मृत्यू झाला युसूफ पूनमवाला (५०) या जखमी व्यक्तीवर बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

मुंबई - कुलाबा येथील ताजमहल हॉटेलच्या मागे असलेल्या चर्चिल चेंबर इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर आग लागली आहे. चर्च चेंबरच्या तिसऱ्या मजल्यावर आज ही आग दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास लागली. घटनास्थळी अग्निशमन दलाचे पथक दाखल झाले असून ६ ते ७ जणांना रेस्क्यू करण्यात आलं. मात्र, या आगीच्या दुर्घटनेत श्याम अय्यर (५४) या पुरुषाचा मृत्यू झाला असून युसूफ पूनमवाला (५०) या जखमी व्यक्तीवर बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

कुलाब्यातील चर्चिल या ४ मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्याला आग लागली. घटनास्थळी अग्निशमन दलासोबत पोलीस देखील घटनास्थळी दाखल असून अग्निशमन दलाचे जवान आग विझविण्याचे केले. दरम्यान अडकलेल्या ६ ते ७ जणांना जवानांनी इमारतीबाहेर काढले. मात्र, जीटी रुग्णालयात दाखल केलेल्या ५४ वर्षीय श्याम अय्यर यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर जखमी असलेले युसूफ पूनमवाला (५०) यांना बॉम्बे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.  आगीवर नियंत्रण मिळविण्यास अग्निशमन दलाच्या जवानांना यश मिळालं आहे. इमारतीच्या खिडक्या तोडून अग्निशमन जवानांनी इमारतीत अडकलेल्या ६ ते ७ जणांची सुखरूप सुटका केली आहे. आगीचं कारण शॉर्ट सर्किट असं म्हटलं जात आहे. मात्र, अग्निशमन दलाकडून अधिकृत दुजोरा मिळाला नसून आगीचे नेमकं कारण अद्याप अधिकृतपणे कळालेलं नाही. मात्र या दुर्घटनेत एकाच मृत्यू झाल्याने याप्रकरणी अपमृत्यूची नोंद कुलाबा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. 

➡  Injury : 2 person injured  out of which 1) Yusuf Poonamwala - 50 yrs - Condition awaited by Dr Nitin More Bombay Hosp.
 2) Shyam Ayyar- 54yrs, declared dead by Dr Shilpa (CMO) GT Hosp.


 


Web Title: one dead and one injured in colaba churchil chamber building fire
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.