मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यभर पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसिज (पीसीओडी) क्लिनिक सुरू करण्याचा निर्णय घेतला. वाढत्या वयानुसार महिलांमध्ये आढळणाऱ्या पीसीओडी समस्येवर वेळेत निदान, उपचार आणि समुपदेशन देण्यासाठी विशेष उपक्रम सुरू केला आहे.
राज्य कुटुंब कल्याण कार्यालय, पुणे यांनी या संदर्भात सर्व जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्याधिकारी आणि महानगरपालिका वैद्यकीय आरोग्याधिकाऱ्यांना आदेश जारी केले आहेत. या निर्णयामुळे महिलांना तज्ज्ञ उपचार आणि मार्गदर्शन एकाच ठिकाणी मिळणार आहे.
राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यानुसार ६ मेपासून सर्व जिल्हा रुग्णालये, सामान्य रुग्णालये, स्त्री-रुग्णालये, १०० खाटांची उपजिल्हा रुग्णालये तसेच महानगरपालिका रुग्णालयांमध्ये पीसीओडी क्लिनिक सुरू झाली आहेत. हे क्लिनिक दर बुधवारी सुरू राहणार आहे.
महिलांना जीवनशैलीसंदर्भातील आरोग्यविषयक समुपदेशन
स्त्रीरोगतज्ज्ञांकडून तपासणी, आवश्यक वैद्यकीय तपासण्या, एकात्मिक पद्धतीने उपचार, आरोग्यविषयक समुपदेशन, आहार व जीवनशैलीसंदर्भातील मार्गदर्शन मिळणार आहे.
काय आहे पीसीओडी?
ही महिलांमध्ये आढळणारी हार्मोनल समस्या असून, त्याचा परिणाम मासिक पाळीतील अनियमितता, वजनवाढ, वंध्यत्व, मानसिक ताण, तसेच इतर आरोग्यविषयक गुंतागुंतीवर होत असतो. विशेषतः किशोरवयीन व प्रजननक्षम वयोगटातील महिलांमध्ये या समस्येचे प्रमाण वाढत असल्याने राज्य शासनाने यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
Web Summary : Maharashtra launches district-level PCOD clinics offering expert diagnosis, treatment, and counseling for women. Clinics operate every Wednesday, providing comprehensive healthcare, lifestyle guidance, and addressing hormonal imbalances. This initiative aims to tackle rising PCOD prevalence, especially among adolescents and women of reproductive age.
Web Summary : महाराष्ट्र में जिला स्तर पर पीसीओडी क्लीनिक शुरू, महिलाओं के लिए विशेषज्ञ निदान, उपचार और परामर्श उपलब्ध। हर बुधवार को चलने वाले क्लीनिक व्यापक स्वास्थ्य सेवा, जीवनशैली मार्गदर्शन और हार्मोनल असंतुलन को संबोधित करते हैं। यह पहल पीसीओडी के बढ़ते प्रसार को लक्षित करती है।