आता ‘एक स्टेशन एक उत्पादन’, मुंबईतील १४ स्थानकांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 08:31 AM2022-09-20T08:31:06+5:302022-09-20T08:31:22+5:30

मुंबईतील १४ रेल्वे स्थानकांवर होणार स्थानिक उत्पादनांची विक्री

Now 'One Station One Product', covering 14 stations in Mumbai | आता ‘एक स्टेशन एक उत्पादन’, मुंबईतील १४ स्थानकांचा समावेश

आता ‘एक स्टेशन एक उत्पादन’, मुंबईतील १४ स्थानकांचा समावेश

googlenewsNext

लाेकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मध्य रेल्वे एक स्थानक एक उत्पादन योजनेअंतर्गत स्थानकांवर स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देत आहे. आतापर्यंत ५० स्थानकांचा यामध्ये समावेश केला आहे. या स्थानकांवर म्हणजे प्रत्येक एका स्थानकांवर ‘एक स्टेशन एक उत्पादन’ सुरू केले आहे. आत्मनिर्भर भारत अंतर्गत रेल्वे स्थानकांना स्थानिक उत्पादनांसाठी प्रमोशन आणि विक्री केंद्र बनवण्यात येणार आहे. त्यामुळे स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन मिळणार आहे. यामध्ये मुंबईतील १४ स्थानकांचा समावेश आहे.

स्टॉल्सचे काम सुरू 
या स्टॉल्सच्या उभारणीचे काम सुरू झाले आहे. या योजनेसाठी मध्य रेल्वेची खास नियुक्त करण्यात आलेली टीम निवडून आलेले लोकप्रतिनिधी, जिल्हा अधिकारी, स्वयंसेवी संस्था, खादी ग्रामोद्योग, हातमाग उद्योग, विक्रेते आणि इतर भागधारक यांच्याशी बैठका आणि समन्वय साधून याच्या प्रभावी आणि यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रसिद्धी माध्यमे आणि सोशल मीडियाद्वारे ‘एक स्टेशन एक उत्पादन योजने’च्या व्यापक प्रसिद्धीवर भर दिला जात आहे.

मुंबईतील या स्थानकांचा समावेश 
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, परळ, दादर, शीव, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, नाहूर, ठाणे, कल्याण, कर्जत, लोणावळा, इगतपुरी आणि चेंबूर 

३५,५५९ वस्तूंची एकूण विक्री 
वन स्टेशन वन प्रोडक्ट योजनेच्या सातव्या टप्प्यातील चौथ्या हंगामात ३५,५५९ वस्तूंची एकूण विक्री करण्यास मदत केली  आहे.

भुसावळ : नाशिकरोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, शेगाव, अकोला, बडनेरा, अमरावती, खंडवा आणि बुरहानपूर 
नागपूर : नागपूर, अजनी, वर्धा, धामणगाव, आमला, बैतूल, चंद्रपूर, बल्हारशाह आणि हिरदागढ 
सोलापूर : सोलापूर, कलबुरगी, कुर्डूवाडी, लातूर, पंढरपूर, दौंड, अहमदनगर, कोपरगाव आणि साईनगर शिर्डी 
पुणे : पुणे, शिवाजी नगर, पिंपरी, कोल्हापूर, मिरज, हातकणंगले, सांगली आणि सातारा 

Web Title: Now 'One Station One Product', covering 14 stations in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.